रोहितच्या अंगठ्याची क्ष-किरण तपासणी
By admin | Published: February 29, 2016 02:42 AM2016-02-29T02:42:40+5:302016-02-29T02:42:40+5:30
भारतीय सलामीवीर फलंदाज रोहित शर्माच्या पायाच्या अंगठ्याची रविवारी क्ष-किरण तपासणी करण्यात आली. पाकिस्तानविरुद्ध आशिया कप सामन्यादरम्यान त्याच्या पायाच्या अंगठ्याला दुखापत झाली
Next
मीरपूर : भारतीय सलामीवीर फलंदाज रोहित शर्माच्या पायाच्या अंगठ्याची रविवारी क्ष-किरण तपासणी करण्यात आली. पाकिस्तानविरुद्ध आशिया कप सामन्यादरम्यान त्याच्या पायाच्या अंगठ्याला दुखापत झाली. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी भारतीय सलामीवीर मैदानात दाखल झाले, त्या वेळी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरचा पहिलाच चेंडू रोहितच्या पायाच्या अंगठ्यावर आदळला. या वेगवान गोलंदाजाचा पुढचा चेंडू फुललेंथ इनस्विंगर होता. त्यावर रोहित पायचित झाला. भारताची यानंतरची लढत मंगळवारी श्रीलंकेविरुद्ध होणार आहे.