‘फिनिशर’ची भूमिका वठवायचीय : हार्दिक पांड्या
By Admin | Published: July 6, 2017 01:38 AM2017-07-06T01:38:31+5:302017-07-06T01:38:31+5:30
मागच्या सामन्यात अपयशी ठरल्यानंतर पाचव्या आणि अखेरच्या वन डेत शानदार कामगिरी करण्याचा दावा करून भारतासाठी
मागच्या सामन्यात अपयशी ठरल्यानंतर पाचव्या आणि अखेरच्या वन डेत शानदार कामगिरी करण्याचा दावा करून भारतासाठी ‘मॅच फिनिशर’ बनण्याचा निर्धार हार्दिक पांड्या याने व्यक्त केला आहे.
भारताला २९ चेंडूंत ३१ धावांची गरज असताना पांड्याने २१ चेंडूंत २० धावा काढल्या; पण मोक्याच्या क्षणी तो बाद होताच ११ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. धोनीसोबतच्या भागीदारीबाबत विचारताच पांड्या म्हणाला, ‘‘१९० धावांचे लक्ष्य गाठण्याचा आम्हा दोघांना विश्वास होता.
आमच्या दोघांमध्ये असलेल्या क्षमतेचा पूर्ण उपयोग केला. साधारणत: २९ चेंडूंत ३१ धावा काढणे मुळीच कठीण नाही; पण तरीही आम्ही अपयशी ठरलो. आम्ही सामना जिंकायला हवा होता, हे मी कबूल करतो; पण यातूनही बरेच शिकायला मिळाले.’’