आरोग्यासाठी वेदनाशमन जेलची भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 04:21 AM2018-12-02T04:21:29+5:302018-12-02T04:21:32+5:30
सामान्य जनताही मॅरेथॉनमध्ये सक्रिय सहभाग घेऊन सुदृढ आरोग्यदायी जीवन जगण्यास प्राधान्य देऊ लागलेली आहे.
- प्रकाश उपाध्याय
सामान्य जनताही मॅरेथॉनमध्ये सक्रिय सहभाग घेऊन सुदृढ आरोग्यदायी जीवन जगण्यास प्राधान्य देऊ लागलेली आहे. आनंददायी उपक्रमात सक्रिय सहभागाबरोबरच त्यांची सुदृढता आणि सहनशीलतेची मर्यादा या माध्यमातून लक्षात येऊ लागलेली आहे.
प्रशिक्षणादरम्यान ध्येयाला केंद्रस्थानी ठेवले जात आहे आणि शरीराच्या विशिष्ट घटकांचा यात मोलाचा वाटा आहे. यादरम्यान वेदना तथा दुखापत झाल्यास वेदनाशमन जेल महत्त्वाचे कार्य करते; परंतु एखाद्या सक्रिय उपक्रमात सहभागी होण्याआधी त्याचा उपयोग कसा करावा, हे समजून घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे.
हे जेल आपल्या शरीरात उष्णता निर्माण करीत आपल्या नसांना सक्रिय बनवण्याचे महत्त्वाचे काम करीत असते. नसांद्वारे सर्वोत्तम रक्ताभिसरण होऊन आॅक्सिजनचा व्यवस्थित पुरवठा शरीरास केला जातो. याव्यतिरिक्त हे वेदनाशमन जेल ताठ सांधे आणि स्नायंूना मजबूत बनविण्याचे सर्वोत्तम कार्य करते. शरीराला पूर्वावस्थेत येण्यासाठी योग्य विश्रांतीची अत्यंत आवश्यकता असते. या जेलच्या वापरामुळे
शरीर पूर्वावस्थेत येण्यास मोलाची मदत होते.
कामादरम्यान स्नायू थकल्यासारखे वाटतात; परंतु या वेदनाशमन जेलचा वापर केल्यास शरीर तथा स्नायू सक्रिय आणि सुदृढ होण्यास चांगली मदत होते यात तिळमात्रही शंका नाही.
व्यवस्थापकीय संचालक आणि पार्टनर विन्टोजिनो