रोनाल्डो ‘फेल’, आॅस्ट्रियाने रोखले

By admin | Published: June 20, 2016 03:16 AM2016-06-20T03:16:39+5:302016-06-20T03:16:39+5:30

जगप्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्याकडे तमाम फुटबॉलपटूंच्या नजरा होत्या. ज्या वेळी अत्यंत महत्त्वपूर्ण क्षणी पोर्तुगालला पेनल्टी मिळाली होती.

Ronaldo 'Fell', the Austrian has stopped | रोनाल्डो ‘फेल’, आॅस्ट्रियाने रोखले

रोनाल्डो ‘फेल’, आॅस्ट्रियाने रोखले

Next

पॅरिस : जगप्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्याकडे तमाम फुटबॉलपटूंच्या नजरा होत्या. ज्या वेळी अत्यंत महत्त्वपूर्ण क्षणी पोर्तुगालला पेनल्टी मिळाली होती. मात्र या पेनल्टीवर गोल नोंदवण्यात रोनाल्डो अपयशी ठरला. याच क्षणामुळे
युरो चषकातील सामन्यात आॅस्ट्रेलियाने पोर्तुगालला गोलशून्य अशा बरोबरीवर रोखण्यात यश मिळवले.
पोर्तुगाल आणि आॅस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी ताकदीने खेळ केला. मात्र, उभय संघांना यश मिळाले नाही. ७९ व्या मिनिटाला पोर्तुगालला गोल नोंदवण्याची संधी मिळाली होती. मात्र, त्यांचा स्टार खेळाडू पेनल्टीला गोलमध्ये रूपांतर करण्यात अपयशी ठरला.
अन्य सामन्यात, हंगेरी आणि आइसलँड यांच्यातील सामना १-१ अशा बरोबरीवर संपुष्टात आला. गिल्फी सिगुर्डसनने ३७व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल नोंदवून आइसलँडला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर अंतिम क्षणी झालेला आत्मघाती गोल आइसलँडसाठी महागडा ठरला. ८८ व्या मिनिटाला बचावपटू बिरकिर सेवारसन याच्याकडून गोल वाचविण्याच्या प्रयत्नात असताना हा आत्मघाती गोल झाला. (वृत्तसंस्था)

Web Title: Ronaldo 'Fell', the Austrian has stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.