माद्रिदच्या विजयात रोनाल्डो ‘हिरो’

By admin | Published: December 10, 2015 12:37 AM2015-12-10T00:37:41+5:302015-12-10T00:37:41+5:30

स्टार स्ट्रायकर क्रिस्तियानो रोनाल्डोने नोंदवलेल्या शानदार चार गोलच्या बळावर रिअल माद्रिदने चॅम्पियन्स लीगमध्ये ‘अ’ गटातील सामन्यात मालमो संघाचा ८-० ने धुव्वा उडवला.

Ronaldo 'Hero' in Madrid's victory | माद्रिदच्या विजयात रोनाल्डो ‘हिरो’

माद्रिदच्या विजयात रोनाल्डो ‘हिरो’

Next

माद्रिद : स्टार स्ट्रायकर क्रिस्तियानो रोनाल्डोने नोंदवलेल्या शानदार चार गोलच्या बळावर रिअल माद्रिदने चॅम्पियन्स लीगमध्ये ‘अ’ गटातील सामन्यात मालमो संघाचा ८-० ने धुव्वा उडवला.सामन्यात रोनाल्डो याने ३९, ४७, ५० आणि ५७ व्या मिनिटाला शानदार गोल नोंदवले. रोनाल्डोसोबतच फ्रान्सचा स्ट्रायकर करीम बेन्जेमा याने हॅट्ट्रिक नोंदवली. माटिओ कोवासिक याने एक गोल नोंदवला. प्रतिस्पर्धी संघाला मात्र एकही गोल नोंदवता आला नाही.
स्पर्धेत रोनाल्डोची गोलसंख्या ११ झाली आहे. याबरोबरच त्याने २०१३-१४ या वर्षातील ९ गोलचा विक्रमही मोडला आहे. आता रोनाल्डोच्या नावावर एकूण ८८ गोल आहेत. विजयानंतर उत्साहित झालेला रोनाल्डो म्हणाला, की वैयक्तिक स्वरूपात एक विक्रम प्रस्थापित केल्याने खूप आनंदी आहे. संघावर सतत झालेल्या टीकेनंतर आम्ही उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. त्यामुळे समाधान आहे. सलग पाचव्या विजयानंतर संघ खूप उत्साहित आहे. या सामन्यात आम्ही सुरुवातीपासून वर्चस्व मिळवले होते. योग्य संतुलनासह खेळ केल्याने आम्ही ठराविक अंतराने गोल नोंदवण्यात यशस्वी झालो. (वृत्तसंस्था)

Web Title: Ronaldo 'Hero' in Madrid's victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.