फिफाच्या उत्कृष्ट खेळाडू पुरस्काराने रोनाल्डो सन्मानित
By Admin | Published: January 10, 2017 02:17 AM2017-01-10T02:17:04+5:302017-01-10T02:17:04+5:30
फिफा संघटनेतर्फे दिल्या जाणार्या उत्कृष्ट खेळाडूच्या पुरस्काराने ख्रिस्तीयानो रोनाल्डोला सन्मानित करण्यात आले.
>ऑनलाइन लोकमत
झूरीच, दि. 10 - फिफा संघटनेतर्फे दिल्या जाणार्या उत्कृष्ट खेळाडूच्या पुरस्काराने ख्रिस्तीयानो रोनाल्डोला सन्मानित करण्यात आले.फिफाचे अध्यक्ष जिआनी इन्फॅन्टीनो यांच्या हस्ते त्याने हा पुरस्कार स्वीकारला. २0१६ मधील उत्कृष्ट फुटबॉल खेळाडूच्या शर्यतीत रोनाल्डोला फ्रान्सच्या अँन्टोनी ग्रीजमन व अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सी या प्रमुख खेळाडूंचे आव्हान होते.या दोन्ही खेळाडूंना मात देत त्याने हा प्रतिष्ठेचा पुरस्कार पटकावला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना रोनाल्डो म्हणाला की, २0१६ हे वर्ष आपल्या कारकिर्दीतील संस्मरणीय ठरले आहे. रोनाल्डोने यापूर्वी बॅलन डीओर पुरस्कारही पटकावला होता. पोर्तुगाल संघाच्या युरो चषक स्पर्धेतील विजयामध्ये रोनाल्डोने महत्वाची भूमिका बजावली होती. उत्कृष्ट रेफ्री म्हणून इटलीच्या क्लाऊडीओ रेनोडी यांना फिफाने याच कार्यक्रमात सन्मानित केले. त्यांनी फ्रान्सच्या झिनेदीन जिदानला मागे टाकून हा पुरस्कार पटकावला.