रोनाल्डो विरुद्ध बॅले

By admin | Published: July 6, 2016 12:51 AM2016-07-06T00:51:12+5:302016-07-06T00:51:12+5:30

अंतिम टप्प्यात पोहोचलेल्या युरो चषक २०१६ फुटबॉल स्पर्धेत बुधवारचा दिवस पोर्तुगाल आणि वेल्ससाठी ‘जीवन-मरणाचा’ प्रश्न घेऊन उगवणार आहे. अंतिम फेरीच्या तिकिटासाठी

Ronaldo vs Barlow | रोनाल्डो विरुद्ध बॅले

रोनाल्डो विरुद्ध बॅले

Next

लियोन : अंतिम टप्प्यात पोहोचलेल्या युरो चषक २०१६ फुटबॉल स्पर्धेत बुधवारचा दिवस पोर्तुगाल आणि वेल्ससाठी ‘जीवन-मरणाचा’ प्रश्न घेऊन उगवणार आहे. अंतिम फेरीच्या तिकिटासाठी हे दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध लढणार असले, तरी या लढतीकडे रोनाल्डो विरुद्ध बॅले असेच पाहिले जात आहे.
स्टार खेळाडूंचा भरणा असलेला पोर्तुगालचा संघ सन २००० पासून आतापर्यंत पाचपैकी चार वेळा सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. परंतु, त्यांना चारपैकी तीन वेळा यापुढे मजल मारता आली नसल्याने यंदा ही प्रथा मोडीत काढण्याची संघाची मनीषा आहे. सन २००४ मध्ये त्यांनी यजमानपद भूषवताना फायनल गाठली; परंतु ग्रीसने त्यांना हरवले होते. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात काही वेळा परिश्रमाने, तर काही वेळा नशिबाने यशस्वी होऊ न पोर्तुगाल मोठ्या स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात पोहचतो; परंतु हा टप्पा मात्र त्यांच्यासाठी संघर्षपूर्ण राहिला आहे. यामध्ये २००६ चा वर्ल्डकप आणि १९८४ च्या युरोकपच्या सेमीफायनलचा समावेश आहे.
जवळ-जवळ ५८ वर्षांनी एखाद्या मोठ्या स्पर्धेची सेमीफायनल खेळत असलेल्या वेल्स संघाला इतिहास निर्माण करण्याची मोठी संधी आहे.
या देशाला मोठा पल्ला गाठण्यास भलेही खूप कालावधी लागला असला, तरी वेल्सचा विद्यमान संघ एक बलाढ्य संघ असून, जबरदस्त फार्मात आहे. ख्रिस कोलमन यांच्या मार्गदर्शनाखाली या संघाने डार्क हॉर्सप्रमाणे स्पर्धेची सेमीफायनल गाठली होती.
वेल्सने साखळी फेरीत स्लोव्हाकिया आणि रशिया संघांना हरवून गटात अव्वल स्थान मिळवले होते. राउंड-१६ मध्ये त्यांनी उत्तर आयर्लंडवर विजय मिळवला. या कामगिरीला आणखी चमकदार करताना वेल्सने उपांत्यपूर्व फेरीत बेल्जियमला हरवले. यामुळे पोर्तुगालला वेल्सविरुद्ध अधिकच सतर्क राहावे लागेल. शिवाय त्यांना सुरुवातीपासूनच आघाडी घ्यावी लागेल. कारण या स्पर्धेत त्यांनी कोणताही सामना ९० मिनिटांत जिंकलेला नाही. विशेष म्हणजे साखळी फेरीत त्यांना एकही
सामना जिंकता आलेला नाही.
सगळे सामने बरोबरीत राहिले
आहेत. नॉकआऊ टमध्ये त्यांनी क्रोएशियाला अतिरिक्त वेळेत, तर उपांत्य फेरीत पोलंडला पेनल्टीमध्ये हरवले होते. (वृत्तसंस्था)

केवळ रोनाल्डोचे आव्हान नाही - बॅले
पोर्तुगाल आणि वेल्स या लढतीकडे रोनाल्डोविरुद्ध बॅले असेच पाहिले जात असले तरी बॅलेला मात्र फक्त रोनाल्डोच नाही, तर अख्खा पोर्तुगाल संघच बलाढ्य वाटतो. बॅले म्हणाला, ‘‘रोनाल्डो हा एक दर्जेदार खेळाडू आहे, तो त्या संघातील सर्वात अनुभवी आणि सर्वात जास्त गोल नोंदवणारा खेळाडू आहे. परंतु या स्पर्धेत तो फारसा लयीत वाटत नाही. ही लढाई आम्हा दोघांतील नाही, तर दोन देशांमधील अकरा- अकरा खेळाडूंमधील आहे. त्यांचे सर्वच खेळाडू चॅम्पियन आहेत, पण आम्ही त्यांना घाबरत नाही.

या सामन्याला जगातील दोन महागड्या खेळाडूंमधील लढत म्हणून पाहिले जात होते. रियाल माद्रिद या एकाच क्लबकडून खेळणाऱ्या पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि वेल्सचा गेराथ बॅले यांच्यातील श्रेष्ठत्वाची परीक्षा पाहणारा हा सामना आहे. रोनाल्डो तिसऱ्यांदा युरोपियन चॅम्पियनशीपमध्ये खेळतो आहे.

बॅलेची ही पहिलीच स्पर्धा असली, तरी त्याने या स्पर्धेत जबरदस्त खेळ दाखवला आहे. रोनाल्डोनेही तीन गोल केले आहेत. क्लब सामन्यात नेहमी एकमेकांच्या साथीने खेळणारे हे दोन दिग्गज एकमेकांविरुद्ध कसे खेळतात, याकडे चाहत्यांचे लक्ष असेल.

Web Title: Ronaldo vs Barlow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.