रोनाल्डोची शानदार हॅट्ट्रिक
By Admin | Published: April 20, 2017 02:54 AM2017-04-20T02:54:07+5:302017-04-20T02:54:07+5:30
स्टार फुटबॉलर ख्रिस्तीयानो रोनाल्डोच्या विवादास्पद हॅट्ट्रिकच्या जोरावर गतविजेत्या रेयाल माद्रिदने चॅम्पियन्स लीग स्पर्धेत विक्रमी सातव्यांदा उपांत्य फेरीत प्रवेश केला
माद्रिद : स्टार फुटबॉलर ख्रिस्तीयानो रोनाल्डोच्या विवादास्पद हॅट्ट्रिकच्या जोरावर गतविजेत्या रेयाल माद्रिदने चॅम्पियन्स लीग स्पर्धेत विक्रमी सातव्यांदा उपांत्य फेरीत प्रवेश केला. अतिरिक्त वेळेमध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात रेयाल माद्रिदने बायर्न म्युनिचचे आव्हान ४-२ असे संपुष्टात आणले.
उपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या फेरीमध्ये बायर्न म्युनिचला १० खेळाडूंसह खेळावे लागले. याचा फायदा घेत रोनाल्डोने आपला धडाका केला. दरम्यान, त्याने नोंदवलेल्या दुसऱ्या व तिसऱ्या गोलवर म्युनिच संघाच्या खेळाडूंनी विरोध केला. रोनाल्डोचे हे दोन्ही गोल आॅफसाइड होते, असा आक्षेप म्युनिचच्या खेळाडूंनी घेतला. मात्र, पंचांनी हे दोन्ही गोल वैध ठरवले. गतविजेत्या रेयाल माद्रिदने ६-३ अशा सरासरीने बाजी मारत सलग सातव्यांदा उपांत्य फेरीत प्रवेश केला. आर्टुरो विडालला मैदान सोडावे लागल्यानंतर रोनाल्डोने आपला जलवा दाखवताना युरोपियन फुटबॉलमध्ये शंभरावा गोल नोंदवल्यानंतर ५ मि. हॅट्ट्रिक नोंदवली.