रुट, अँडरसनची विश्वविक्रमी भागीदारी
By admin | Published: July 12, 2014 11:09 PM2014-07-12T23:09:40+5:302014-07-12T23:09:40+5:30
विश्वविक्रमी भागीदारीच्या जोरावर इंग्लंडने भारताविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात 39 धावांची आघाडी घेतली.
Next
नॉटिंघम : जो. रुट व जेम्स अँडरसन यांनी अखेरच्या विकेटसाठी केलेल्या विश्वविक्रमी भागीदारीच्या जोरावर इंग्लंडने भारताविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात 39 धावांची आघाडी घेतली. भारताच्या पहिल्या डावातील 457 धावसंख्येच्या प्रत्युत्तरात खेळताना इंग्लंडने आज पहिल्या डावात 496 धावांची मजल मारली. पहिल्या डावात 39 धावांनी पिछाडीवर पडलेल्या भारतीय संघाने दुस:या डावात आज चौथ्या दिवशी चहापानाला खेळ थांबला त्यावेळी 1 बाद 57 धावांची मजल मारली होती. शिखर धवन (27) माघारी परतल्यानंतर मुरली विजय ( 19) आणि चेतेश्वर पुजारा (8) खेळपट्टीवर होते.
त्याआधी, जो. रुट (नाबाद 154) आणि जेम्स अँडरसन (81) यांनी अखेरच्या गडय़ासाठी 198 धावांची विश्वविक्रमी भागीदारी नोंदविली. भुवनेश्वर कुमारने अँडरसनला तंबूचा मार्ग दाखवित इंग्लंडचा डाव संपुष्टात आणला. भुवनेश्वरने कारकिर्दीत प्रथमच पाच बळी घेण्याची कामगिरी केली. भुवनेश्वरने 82 धावांच्या मोबदल्यात 5 फलंदाजांना तंबूची वाट दाखविली. रुट व अँडरसन यांनी यापूर्वीचा 1क् व्या गडय़ासाठी ऑस्ट्रेलियाचा फिल ह्युजेस व अश्टन अगर यांच्या नावावर असलेला 163 धावांचा विक्रम मोडला.
आज चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाज बळी घेण्यासाठी संघर्ष करीत असल्याचे चित्र होते. रुट व अँडरसन यांनी 111 वर्षापूर्वी इंग्लंडतर्फे 1क् व्या विकेटसाठी नोंदविलेला 13क् धावांच्या भागीदारीचा विक्रमही यावेळी मोडला.
दुस:या दिवशी उपहारानंतर जी पडझड झाली त्याला सहकारी फलंदाज दोषी नव्हते. तो दिवस संघासाठी चांगला नव्हता अशी कबुली इंग्लंडचा मधल्या फळीतील आधारस्तंभ ज्यो रुट याने दिली.पहिल्या कसोटीत दुस:या दिवशी उपहारानंतर इंग्लंडने 74 धावांत सहा गडी गमावले.
त्यामुळे भारताची पकड घट्ट झाली होती.
यॉर्कशायरचा फलंदाज असलेल्या रुटने सर्वाधिक 154 धावांची खेळी केली. याशिवाय त्याने जेम्स अॅण्डरसनसोबत अखेरच्या गडय़ासाठी 198 धावांची विश्वविक्रमी भागीदारी केली. यानंतर तो म्हणाला,‘ आमच्या आघाडीच्या फलंदाजांनी देखणी कामगिरी केली पण दिवसाचा खेळ चांगला झाला नाही. आम्हाला चुकांपासून बोध घ्यावा लागणार आहे. आघाडीच्या फळीतील आमच्या नऊ फलंदाजांच्या नावांवर शतकांची नोंद आहे. पण तळाच्या फलंदाजांनी जे धैर्य दाखविले त्यावर गर्व वाटतो. आता पुन्हा भारतावर दडपण आणू शकलो याचा आनंद आहे.’(वृत्तसंस्था)
धावफलक
भारत पहिला डाव 457.
इंग्लंड पहिला डाव : अॅलिस्टर कुक त्रि. गो. शमी क्5, सॅम रॉबसन पायचित गो. ईशांत 59, गॅरी बॅलन्स पायचित गो. ईशांत 71, इयान बेल ङो. धोनी गो. ईशांत 25, जो. रुट नाबाद 154, मोईन अली ङो. धवन गो. शमी 14, मॅट प्रायर ङो. धोनी गो. भुवनेश्वर क्5, बेन स्टोक्स ङो. धोनी गो. भुवनेश्वर क्क्, स्टुअर्ट ब्रॉड पायचित गो. भुवनेश्वर 47, लिअम प्लंकेट त्रि. गो. भुवनेश्वर क्7, जेम्स अँडरसन ङो. धवन गो. अँडरसन 81. अवांतर (28). एकूण 144.5 षटकांत सर्वबाद 496. बाद क्रम : 1-9, 2-134, 3-154, 4-172, 5-197, 6-2क्2, 7-2क्2, 8-28क्, 9-298, 1क्-496. गोलंदाजी : भुवनेश्वर 3क्.5-8-82-5, शमी 29-3-128-2, ईशांत 38-3-15क्-3, जडेजा 35-5-8क्-क्, बिन्नी 1क्-क्-37-क्, विजय 2-क्-8-क्.
भारत दुसरा डाव : मुरली विजय खेळत आहे 27, शिखर धवन ङो. व गो. अली 29, पुजारा खेळत आहे 1क्. अवांतर (1). एकूण 14 षटकांत 1 बाद 67. बाद क्रम : 1-49. गोलंदाजी : अँडरसन 4-1-16-क्, स्टुअर्ट ब्रॉड 5-क्-22-क्, प्लंकेट 3-1-8-क्, अली 1-क्-12-1, स्टोक्स 1-क्-9-क्.