रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचे रायझिंग पुणे सुपरजाएंटसमोर 186 धावांचं लक्ष्य

By Admin | Published: April 22, 2016 09:35 PM2016-04-22T21:35:20+5:302016-04-22T21:35:20+5:30

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं धमाकेदार खेळी करत रायझिंग पुणे सुपरजाएंटसमोर 186 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे.

Royal Challengers Bangalore's Raising Pune SuperJent 186 runs in front of the target | रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचे रायझिंग पुणे सुपरजाएंटसमोर 186 धावांचं लक्ष्य

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचे रायझिंग पुणे सुपरजाएंटसमोर 186 धावांचं लक्ष्य

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 22-  विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं धमाकेदार खेळी करत रायझिंग पुणे सुपरजाएंटसमोर 186 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं 20 षटकांत 3 बाद 185 धावा काढल्या आहेत. धोनीचा रायझिंग पुणे सुपरजाएंट आणि कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघ 3 लढतीत 1 विजयासह 2 गुणांवर आहेत. पुणे संघानं सलामीच्या आयपीएल लढतीत गतविजेत्या मुंबई इंडियन्सलाही पराभवाची धूळ चारली होती. या सामन्यात विराह कोहलीनं नाबाद 2 षटकार आणि 7 चौकार लगावत 80 धावा काढल्या आहे. राहुल 7, वेटसन 1, खान 2,  तर ए बी डिव्हिलियर्स 4 षटकार आणि 6 चौकार खेचत 83 धावा काढल्यात. रायझिंग पुणे सुपरजाएंटनं टॉस जिंकत गोलंदाजी स्वीकारली होती.

Web Title: Royal Challengers Bangalore's Raising Pune SuperJent 186 runs in front of the target

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.