रॉयल चॅलेंजर्सला १३९ धावांवर रोखले
By admin | Published: May 22, 2015 09:38 PM2015-05-22T21:38:06+5:302015-05-22T21:38:06+5:30
नेहमी प्रमाणे तडाखेबंद फलंदाजी करत सलामी वीर ख्रिस गेलने तीन षटकार व दोन चौकार लगावत ४१ धावा केल्या. रैनाच्या गोलंदाजीवर झेल गेल्याने तो बाद झाला
Next
>ऑनलाइन लोकमत
रांची, दि. २२ - नेहमी प्रमाणे तडाखेबंद फलंदाजी करत सलामी वीर ख्रिस गेलने तीन षटकार व दोन चौकार लगावत ४१ धावा केल्या. रैनाच्या गोलंदाजीवर झेल गेल्याने तो बाद झाला. विराट कोहली गेले दोन सामने आपल्या खेळाचे विराट प्रदर्शन करू न शकल्याने चाहत्यांची घोर निराशा. त्यानंतर आलेल्या डिव्हिलिअर्स व मनदीप सिंगने अनुक्रमे एक व चार धावा करत तंबूत परतले. शेवटच्या फळीतील दिनेश कार्तिकेने धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला असता नेहराच्याच चेंडूवर पुन्हा मोहित शर्माकडे झेल गेल्याने तो तंबूत परतला. सरते शेवटी सर्फराज खान षटकारमारण्याच्या प्रयत्नात असताना ब्राव्होकडे झेल गेल्याने बाद झाला व प्रेक्षकांनी बेंगळूरू संघाकडून घोर निराशा झाली. चेन्नई सुपरकिंग्जचा गोलंदाज आशिष नेहराने चार षटकांत तीन गडी बाद केले.