बंगळुरुचा रॉयल विजय
By admin | Published: May 21, 2015 12:21 AM2015-05-21T00:21:18+5:302015-05-21T00:21:18+5:30
बंग्गळुरुचा संघ अंतिम सामन्यापासून एक पाऊल दूर असून, त्यासाठी त्यांना रांची येथे २२ मे रोजी चेन्नई सुपर किंग्जचे आव्हान मोडावे लागेल.
राजस्थानवर ७१ धावांनी मात :
सांघिक कामगिरीच्या जोरावर मिळविला जय
विशाल शिर्के ल्ल पुणे
खराब सुरुवातीनंतर धडाकेबाज फलंदाज एबी डिव्हिलियर्स (३८ चेंडूत ६६ धावा) व मनदीप सिंग (नाबाद ५४) या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी तब्बल ११३ धावांची केलेली भागिदारी डेव्हिड वाईज, हर्षल पटेल, एस. अरविंद व यजुवेंद्र चहल यांनी घेतलेल्या प्रत्येकी २ बळींच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने राजस्थान रॉयल्सवर ७१ धावांनी ‘रॉयल’ विजय मिळविला. बंग्गळुरुचा संघ अंतिम सामन्यापासून एक पाऊल दूर असून, त्यासाठी त्यांना रांची येथे २२ मे रोजी चेन्नई सुपर किंग्जचे आव्हान मोडावे लागेल.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बंगळुरू संघाने विजयासाठी राजस्थानला १८१ धावांचे लक्ष्य दिले होते. राजस्थानचा संघ १९ षटकांत १०९ धावांत गारद झाला. यंदाच्या मोसमातील राजस्थानची ही नीचांकी धावसंख्या ठरली. राजस्थानचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. अजिंक्य रहाणे (३९ चेंडूत ४२ धावा) याचा अपवाद वगळता एकही फलंदाज बंगळुरुच्या गोलंदाजांसमोर तग धरु शकला नाही. शेन वॉट्सन (१०), संजू सॅमसन (५), स्टीव्ह स्मिथ (१२), करुण नायर (१२), दीपक हुडा (११) झटपट बाद झाले. स्टुअर्ट बिन्नी व ख्रिस मॉरिस तर भोपळाही फोडू शकले नाहीत. चहलने धवल कुलकर्णीचा (३) त्रिफळा उडवित राजस्थानचा डाव संपुष्टात आणला.
तत्पूर्वी ख्रिस गेल (२६ चेंडूत २७ धावा) व विराट कोहलीला (१८ चेंडूत १२ धावा) धवल कुलकर्र्णीने झटपट बाद करीत बंगळुरुची अवस्था २ बाद ४६ अशी केली. त्यानंतर एबी डिव्हिलियर्सने ४ चौकार व ४ षटकाराच्या सहाय्याने ६६
धावांची आक्रमक खेळी केली. डिव्हिलियर्स धावबाद झाल्यानंतर दिनेश कार्तिक (८) झटपट बाद झाला. मनदीपने ७ चौकार व २ षटकाराच्या सहाय्याने ५४ धावांची नाबाद खेळी करीत संघाला २० षटकांत ४ बाद १८० धावापर्यंत मजल मारुन दिली.
धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : ख्रिस गेल त्रि. गो. धवल कुलकर्णी २७, विराट कोहली गो. व झे. कुलकर्णी १२, एबी डिव्हिलियर्स धावबाद (बिन्नी/फॉल्कनर) ६६, मनदीप सिंग नाबाद ५४, दिनेश कार्तिक झे. रहाणे गो. मॉरिस ८, सर्फराज खान नाबाद १; अवांतर : १२; एकूण : ४ बाद १८०; गोलंदाजी : ख्रिस मॉरिस ४-०-४२-१, जेपी फॉल्कनर ४-०-४२-०, धवल कुलकर्णी ४-०-२८-२, शेन वॉटसन ४-०-३२-०, अंकित शर्मा ३-०-२८-०, स्टुअर्ड बिन्नी १-०-१-०;
राजस्थान रॉयल्स : अजिंक्य रहाणे झे. डिव्हिलियर्स गो. चहल ४२, शेन वॉटसन झे. कार्तिक गो. अरविंद १०, संजू सॅमनस झे. कार्तिक गो. पटेला ५, स्टिवन स्मिथ झे. डिव्हिलियर्स गो. वीस १२, करुण नायर झे. कार्तिक गो. पटेल १२, दीपक हुडा स्टार्क गो. वीस ११, जेपी फॉल्कनर गो. व झे. अरविंद ४, स्टुअर्ड बिन्नी धावबाद (चहल/कार्तिक)०, ख्रिस मॉरिस झे. चहल गो. मॉरिस ०, अंकित शर्मा नाबाद ७, धवल कुलकर्णी त्रि. गो. चहल ३; अवांतर : ३; एकूण : १९ षटकांत सर्वबाद १०९; गोलंदाजी : मिशेल स्टार्क ४-०-२२-१, एस. अरविंद ४-०-२०-२, हर्षल पटेल ३-०-१५-२, डेव्हिड वीस ४-०-३२-२, यजुवेंद्र चहल ४-०-२०-२.