सीएसके व आरआरसाठी धावले स्वामी

By Admin | Published: September 21, 2015 11:50 PM2015-09-21T23:50:04+5:302015-09-21T23:50:04+5:30

चेन्नई सुपरकिंग्ज (सीएसके) आणि राजस्थान रॉयल्स (आरआर) या दोन संघांना आयपीएलमधून निलंबित करण्याच्या निर्णयाला आव्हान देताना भाजपा

Runaway owner for CSK and RR | सीएसके व आरआरसाठी धावले स्वामी

सीएसके व आरआरसाठी धावले स्वामी

googlenewsNext

चेन्नई : चेन्नई सुपरकिंग्ज (सीएसके) आणि राजस्थान रॉयल्स (आरआर) या दोन संघांना आयपीएलमधून निलंबित करण्याच्या निर्णयाला आव्हान देताना भाजपा नेते सुब्रहमण्यन स्वामी यांनी मद्रास उच्च न्यायालयात याचिका सादर केली आहे. आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी स्पर्धेच्या पुर्ण घटनाक्रमला प्रभावित केल्याने आयपीएलमधील या दोन महत्त्वाच्या आणि स्टार संघावर निलंबनाची कारवाई झाल्याचा आरोप स्वामी यांनी केला आहे.
ही याचिका क्रिकेटच्या भल्यासाठी असल्याचे सांगतानाच स्वामी यांनी या दोन संघावर न्यायमूर्ती आर. एम. लोढा समितीने लादलेल्या निलंबनाच्या आदेशावर अंतरिम स्थगिती देण्याबाब्त अपील केले
आहे.
या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार होती. मात्र याआधीच सीएसकेने आपल्यावर लादलेल्या निलंबनाविरोधाच्या आदेशाला आव्हान दिले आहे. त्यामुळे
न्यायाधीश संजय कौल आणि न्यायमूर्ती टी. एस. शिवलिंगम यांच्या न्यायपीठाने सीएसकेच्या याचिकेसहच याबबतीत निर्णय देण्यात येईल असे सांगितले. सीएसकेने दिलेल्या याचिकेवर २३ सप्टेंबरला सुनावणी होईल.(वृत्तसंस्था)

Web Title: Runaway owner for CSK and RR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.