आजपासून ‘रन’संग्राम

By Admin | Published: February 24, 2016 03:43 AM2016-02-24T03:43:34+5:302016-02-24T03:43:34+5:30

रणजी स्पर्धेच्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या मुंबई व सौराष्ट्र संघांत बुधवारपासून (दि. २४) विजेतेपदाची लढत होत आहे. क्रिकेटप्रेमींना या ‘रन’संग्रामाचा

Run'Calm from today | आजपासून ‘रन’संग्राम

आजपासून ‘रन’संग्राम

googlenewsNext

पुणे : रणजी स्पर्धेच्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या मुंबई व सौराष्ट्र संघांत बुधवारपासून (दि. २४) विजेतेपदाची लढत होत आहे. क्रिकेटप्रेमींना या ‘रन’संग्रामाचा आस्वाद विनामूल्य घेता येणार आहे.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना होत आहे. मुंबईचा संघ ४५ व्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. सौराष्ट्राचा संघ दुसऱ्यांचा अंतिम फेरीत स्थान मिळविण्यात यशस्वी ठरला आहे. हे दोन संघ २०१२-१३ मध्ये अंतिम फेरीत समोरासमोर आले होते. त्यात मुंबईने सौराष्ट्रला एक डाव व १२५ धावांनी पराभूत करीत ४० वा किताब नावावर केला होता. मुंबईने उपांत्य फेरीत पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर मुंबईने मध्य प्रदेश संघाला मात दिली होती. सौराष्ट्र संघाने आसाम संघावर तिसऱ्या दिवशी १० गडी राखून विजय मिळविला. त्यामुळे सौराष्ट्र संघ चांगली लढत देईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. रणजीच्या ८२ वर्षांच्या इतिहासात मुंबईने ४० वेळा किताब नावावर केला आहे. चार वेळा ते उपविजेते राहिले आहेत. मुंबई १९९१ नंतर खेळलेल्या दहा अंतिम सामन्यांत एकदाही हरलेली नाही. मुंबईची मदार ही फलंदाजांवर असेल. श्रेयस
अय्यरने या मोसमात दहा सामन्यांत ३ शतके व ७ अर्धशतकांच्या सहाय्याने १ हजार २०४ धावांची खेळी केली आहे. अखिल हेरवाडकर (८७९), सूर्यकुमार यादव (७४०), सिद्धेश लाड (६०३)
व कर्णधार आदित्य तारे (५५०)
अशी भक्कम फलंदाजांची फळी मुंबईकडे आहे.
सौराष्ट्रचा जलदगती गोलंदाज जयदेव उनाडकट बहरात असून, त्याच्या नावावर २० बळी आहेत. त्याने उपांत्यपूर्व फेरीत ७० धावांत व २५ धावांत प्रत्येकी ५ बळी घेतले होते. उपांत्य सामन्यांत ७७ धावांत ६ व ४५ धावांत ५ बळी टिपले आहेत. याशिवाय चेतेश्वर पुजाराने
उपांत्य फेरीत शतकी खेळी केली होती. शेल्डन जॅक्सन (५२५), सागर जोगियानी (४७४) देखील चांगले बहरात आहेत. (क्रीडा प्रतिनिधी)

मुंबई : आदित्य तारे (कर्णधार-यष्टीरक्षक), सुर्यकुमार यादव, अभिषेक नायर, अखिल हेरवाडकर, श्रेयस अय्यर, निखिल पाटील, शार्दुल ठाकुर, सिद्धेश लाड, धवल कुलकर्णी, विशाल दाभोलकर, इक्बाल अब्दुल्ला, बद्रे आलम, भाविन ठक्कर, सुफियान शेख, बलविंदर सिंग संधु.
सौराष्ट्र : जयदेव शहा (कर्णधार), शेल्डन जॅक्सन, अवि बारोत, चेतेश्वर पुजारा, चिराग जानी, जयदेव उनादकट, प्रेरक मनजाद, कमलेश मकवाना, धर्मेंद्रसिंह जडेजा, वंदित जीवराजानी, अर्पित वासवदा, दिपक पुनिया, हार्दिक राठोड, मोहसिन दोडिया, सागर जोगियानी (यष्टीरक्षक).

श्रेयस अय्यर बाराशे धावांच्या घरात
मुंबईचा श्रेयस अय्यर (१ हजार २०४) हा एकाच मोसमात १२०० हून अधिक धावा करणारा पाचवा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी केदार जाधव (१२२३), वसीम जाफर (१२६०), विजय भारद्वाज (१२८०) व व्हीव्हीएस लक्ष्मण (१४१५) या खेळाडूंचा समावेश आहे.

 

Web Title: Run'Calm from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.