"हो, मी 'लेस्बियन' आहे"; रशियन सौंदर्यवती टेनिसपटू Daria Kasatkina हिचा मुलाखतीत खळबळजनक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 09:49 PM2022-07-21T21:49:01+5:302022-07-21T21:49:55+5:30
"मी आयुष्यभर कैदेत राहूच शकत नाही.."
Daria Kasatkina: रशियाची स्टार महिला टेनिसपटू दारिया कसात्किना हिने एका मुलाखतीत खळबळजनक खुलासा केला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखती दरम्यान तिने ती लेस्बियन असल्याचं सांगितलं. दारिया ही टेनिस जगतातील एक प्रसिद्ध नाव आहे. ती सध्या जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानी विराजमान आहे. अशा वेळी दारियाला एकरा युट्यूब चॅनेलवर मुलाखतीसाठी बोलावण्यात आलं होतं. या मुलाखतीत तिने ती लेस्बियन असल्याचं गुपित उघड केलं.
@DKasatkina mama I’m a criminal pic.twitter.com/cCU05hr9tv
— Natalia Zabiiako (@NataliaZabiiako) July 19, 2022
रशियामध्ये एक कायदा करण्यात आला आहे. या कायद्या अंतर्गत लेस्बियन, गे किंवा गैर-पारंपरिक पद्धतीचे सेक्शुअल संबंध ठेवण्यावर निर्बंध ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे तिने स्वत: बद्दलची अतिसंवेदशनील बाब उघड केल्यानंतर स्वत:चेच देशवासी तिला ट्रोल करताना दिसत आहेत. कायद्याची अंमलबजावणी झाल्यानंतर २५ वर्षांच्या दारियाने हा खुलासा केला. त्यामुळे तिच्यावर टीका करण्यात येत आहे. मात्र, त्या कायद्याबाबत दारियाने अतिशय रोखठोक भूमिका मांडली आहे. ' अनेक वेळा काही महत्त्वाच्या आणि गरजेच्या गोष्टींवर कायद्याने बंदी घातली जाते. पण त्यावर इतकी हबकून जाण्याची काहीच गरज नाही', असं ती म्हणाली.
Chilling after winning @NastiaPav 😝😝😝😝 https://t.co/DZRrx5ybKg
— Daria Kasatkina (@DKasatkina) November 10, 2021
रशियामध्ये गे किंवा लेस्बियन असणं हे हास्यास्पद मानलं जातं. पण मला असं वाटतं की या जगात 'स्ट्रेट' असणं अजिबात सोपं नाही. एखाद्याला संधी दिली तर तो व्यक्ति मुद्दाम समलैंगिक संबंधांची निवड करत नसतो. रशियात तरी अशीच परिस्थिती आहे. कारण रशियातील लोकांना वैचारिक स्वातंत्र्य देणं अजिबात मान्य नाही. त्यांना कसलेही स्वातंत्र्य दिलं जात नाही. माझ्या साठी अशा कैदेमध्ये राहणं शक्य असल्याने मी जे आहे ते स्पष्ट बोलते, असेही दारिया मुलाखतीत म्हणाली.