रशियाच्या अ‍ॅथ्लिटस्वर बंदी कायम

By admin | Published: July 21, 2016 07:41 PM2016-07-21T19:41:12+5:302016-07-21T19:41:12+5:30

सरकार पुरस्कृत डोपिंगमध्ये अडकलेल्या रशियातील अ‍ॅथ्लिटस्वर आंतरराष्ट्रीय अ‍ॅथ्लेटिक्स महासंघाने घातलेली बंदी सर्वोच्च क्रीडा लवादाने कायम ठेवल्यामुळे या खेळाडूंच्या आगामी रिओ

Russia's athletic ban continued | रशियाच्या अ‍ॅथ्लिटस्वर बंदी कायम

रशियाच्या अ‍ॅथ्लिटस्वर बंदी कायम

Next

क्रीडा लवादाने अपील फेटाळले : रिओ आॅलिम्पिकबाहेर होण्याचे संकट
लुसाने : सरकार पुरस्कृत डोपिंगमध्ये अडकलेल्या रशियातील अ‍ॅथ्लिटस्वर आंतरराष्ट्रीय अ‍ॅथ्लेटिक्स महासंघाने घातलेली बंदी सर्वोच्च क्रीडा लवादाने कायम ठेवल्यामुळे या खेळाडूंच्या आगामी रिओ आॅलिम्पिकमधील सहभागावर प्रश्नचिन्ह कायम आहे.
रशियाच्या खेळाडूंचे अपील गुरुवारी क्रीडा लवादाने फेटाळून लावले.

प्रतिबंधित सेवनात रशियाचे खेळाडू आघाडीवर असल्याचे आणि त्यांना सरकारचेच प्रोत्साहन असल्याने आयएएफला आढळून आल्यानंतर त्यांच्यावर आॅलिम्पिक अ‍ॅथ्लेटिक्स स्पर्धेत सहभागी होण्याबाबत बंदी घालण्यात आली. या बंदीला रशियन आॅलिम्पिक समिती आणि अ‍ॅथ्लेटिक्स महासंघाने क्रीडा लवादात आव्हान दिले होते पण लवादाने ते फेटाळून लावले.
क्रीडा लवादाच्या या निर्णयानंतर आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समिती केवळ अ‍ॅथ्लेटिक्समधूनच नव्हे तर संपूर्ण आॅलिम्पिकमधून रशियाला बेदखल करू शकते, अशी शक्यता वर्तविली जात आहे. असे घडल्यास क्रीडा महाशक्ती असलेल्या रशियाची पुरती नाचक्की होईल. यामुळे आॅलिम्पिक आंदोलनाला देखील धक्का बसणार आहे.

१९८० मध्ये अमेरिका आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांनी मॉस्को आॅलिम्पिकवर बहिष्कार टाकला होता. तत्कालीन सोव्हिएत संघाने नंतर १९८४ च्या लॉस एंजिलिस आॅलिम्पिकवर बहिष्कार टाकला. रशियाच्या सध्याच्या स्थितीमुळे पुन्हा एकदा गोंधळ होण्याची भीती आहे. क्रीडा लवादाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देत रशियाच्या अधिकृत प्रवक्त्याने लवादाचा निर्णय निराशादायी असल्याचे सांगितले. आम्ही डोपिंगमुक्त खेळावर भर देत आहोत पण खेळाडूंना आॅलिम्पिकपासून वंचित ठेवणे योग्य नाही. डोपिंगशी ज्यांचा काडीमात्र संबंध नाही, अशा खेळाडूंवर अन्याय होणार आहे. 

Web Title: Russia's athletic ban continued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.