रुथलेस एफसीचा विजयी ‘पंच’

By admin | Published: June 21, 2016 03:13 AM2016-06-21T03:13:29+5:302016-06-21T03:13:29+5:30

स्ट्रायकर अ‍ॅग्नेलो पिकार्डोच्या शानदार दोन गोलच्या जोरावर रुथलेस फुटबॉल क्लबने एकतर्फी झालेल्या सामन्यात आयसी कोल्ट फुटबॉल क्लबचा ५-० असा धुव्वा उडवत बोरीवली फुटबॉल प्रीमियर लीग स्पर्धेत आगेकूच केली

Ruthless FC's winning 'punch' | रुथलेस एफसीचा विजयी ‘पंच’

रुथलेस एफसीचा विजयी ‘पंच’

Next

मुंबई : स्ट्रायकर अ‍ॅग्नेलो पिकार्डोच्या शानदार दोन गोलच्या जोरावर रुथलेस फुटबॉल क्लबने एकतर्फी झालेल्या सामन्यात आयसी कोल्ट फुटबॉल क्लबचा ५-० असा धुव्वा उडवत बोरीवली फुटबॉल प्रीमियर लीग स्पर्धेत आगेकूच केली. दुसऱ्या बाजूला रेमायकन एसए आणि आय.सी. युनायटेड यांच्यातील सामना १-१ असा बरोबरीत सुटला.
बोरीवली स्पोटर््स फाऊंडेशनच्या वतीने सेंट अ‍ॅसिसि मैदानात सुरु असलेल्या या स्पर्धेत रुथलेस संघाने तुफानी आक्रमण करताना आयसी कोल्टला दबावाखाली ठेवले. २१ व्या मिनिटाला पिकार्डोने प्रतिस्पर्धी गोलरक्षकाला चकमा देत गोल लगावला. त्यानंतर लगेचच २८ व्या मिनिटाला शशांक रावने गोल करुन संघाला मध्यांतराला २-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली.
विश्रांतीनंतर कोल्ट संघाने पिछाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र रुथलेसच्या बचावापुढे त्यांचा निभाव लागला नाही. विनायक सकपाळने ४९ व्या व किगन परेराने ५८ व्या मिनिटाला गोल करुन रुथलेसला ४-० अशा आघाडीवर नेले. पिकार्डोने यानंतर ६० व्या मिनिटाला गोल करुन संघाच्या विजयावर शिक्का मारला.
दुसरीकडे रेमायकन एसए व आयसी युनायटेड यांनी प्रत्येकी एक गोल करुन सामना १-१ असा बरोबरीत सोडवला. रेमायकन एसएकडून रोर्क कुथिनोने तर आयसी युनायटेडकडून वेन त्रिनादादे यांनी प्रत्येकी एक गोल केला. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Ruthless FC's winning 'punch'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.