‘सचिनने खेळात सहजतेने बदल केला’

By admin | Published: January 4, 2015 01:21 AM2015-01-04T01:21:47+5:302015-01-04T01:21:47+5:30

सचिन तेंडुलकरने आधुनिक काळादरम्यान तिन्ही स्वरूपात गरजेनुसार फलंदाजीत सहजपणे बदल केला.

'Sachin changed the game smoothly' | ‘सचिनने खेळात सहजतेने बदल केला’

‘सचिनने खेळात सहजतेने बदल केला’

Next

दुबई : सचिन तेंडुलकरने आधुनिक काळादरम्यान तिन्ही स्वरूपात गरजेनुसार फलंदाजीत सहजपणे बदल केला. असा बदल करणारा तो दोन फलंदाजांपैकी एक असल्याचे वेस्ट इंडिजचा महान फलंदाज सर व्हिवियन रिचर्डस् यांनी म्हटले आहे.
सचिन तेंडुलकरशिवाय असा फलंदाज हा श्रीलंकेचा कुमार संगकारा आहे. ते म्हणाले, जेव्हा आवश्यकतेनुसार बदल करण्याचा विषय येतो तेव्हा वेगवेगळ्या स्वरूपाच्या आवश्यकतेनुसार स्वत:ला कसे बदलावे या बाबीसाठी तुमच्याकडे चातुर्य हवे असते. आधुनिक काळात असे बदल करणारी दोन नावे आपल्यासमोर येतात, ते म्हणजे सचिन तेंडुलकर आणि कुमार संगकारा.
रिचर्डस् यांनी २०१५च्या विश्वचषकाआधी आयसीसीसाठी लिहिलेल्या पहिल्या स्तंभात लिहिले, ‘तेंडुलकर व संगकारा यांनी क्रिकेटमधील सर्वच स्वरूपानुसार आपल्या खेळात सहजपणे बदल केले. जर तुम्ही क्रिकेटवर प्रेम करता, तर ते तुम्ही सहजपणे करू शकता.’ (वृत्तसंस्था)

Web Title: 'Sachin changed the game smoothly'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.