सचिन, द्रविड, सौरभ, लक्ष्मणला दीड कोटींचा प्रस्ताव
By admin | Published: May 23, 2015 01:11 AM2015-05-23T01:11:34+5:302015-05-23T01:11:34+5:30
भारतीय क्रिकेटचे दिग्गज सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरभ गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांना एकरकमी दीड कोटी देण्याचा बीसीसीआयने प्रस्ताव ठेवला आहे.
चेन्नई : भारतीय क्रिकेटचे दिग्गज सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरभ गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांना एकरकमी दीड कोटी देण्याचा बीसीसीआयने प्रस्ताव ठेवला आहे.
बीसीसीआयच्या आर्थिक समितीने या माजी खेळाडूंना एकवेळ लाभ देण्याच्या योजनेंतर्गत प्रत्येकी दीड कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला. याशिवाय महिला आणि ज्युनियर क्रिकेटपटूंच्या सामना शुल्कात वाढ करण्यात येणार आहे. यावर अंतिम निर्णय मात्र झालेला नाही. महिला खेळाडूंना पुरुष खेळाडूंच्या तुलनेत फार कमी पारिश्रमिक मिळते. त्यामुळे त्यांच्या वेतनात वाढ आणि ज्युनियर खेळाडूंना देखील चांगली रक्कम देण्याचा बोर्डाचा विचार आहे.
गेल्या काही वर्षांत बोर्डाचा नफा कमी होत गेल्याने त्याचा विपरीत परिणाम खेळाडूंना देण्यात येणाऱ्या रकमेवर पडला. यापुढे खेळाडूंना किती वेतन द्यावे याची निश्चित रक्कम ठरविण्याचा समितीने निर्णय घेतला. असे झाल्यास बोर्डाचा नफा कमी झाला तरी खेळाडूंना मिळणारी रक्कम कमी होणार नाही. याबाबत पुढील बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाईल. (वृत्तसंस्था)