‘शाही’ परिवारासोबत सचिन खेळला क्रिकेट
By admin | Published: April 11, 2016 02:04 AM2016-04-11T02:04:45+5:302016-04-11T02:04:45+5:30
मुंबईच्या ओव्हल मैदानावर महान फलंदाज सचिन तेंडुलकरने रविवारी ब्रिटनचे प्रिन्स विल्यम्स यांच्यासोबत क्रिकेट खेळले आणि त्याने आतापर्यंतची संभवता सर्वांत संथ गोलंदाजी केली.
मुंबई : मुंबईच्या ओव्हल मैदानावर महान फलंदाज सचिन तेंडुलकरने रविवारी ब्रिटनचे प्रिन्स विल्यम्स यांच्यासोबत क्रिकेट खेळले आणि त्याने आतापर्यंतची संभवता सर्वांत संथ गोलंदाजी केली.
विल्यम्सबरोबर त्याची पत्नी केट मिडलटनदेखील उपस्थित होती आणि या दोघांनी आज भारत दौऱ्याची सुरुवात केली. ताज हॉटेलमध्ये २६ नोव्हेंबरच्या पीडितांना श्रद्धांजली देणाऱ्या या दोघांचा हा पहिला मोठा सार्वजनिक कार्यक्रम होता.
तेंडुलकरने पहिला चेंडू टाकल्यानंतर एका शालेय विद्यार्थिनीने ड्यूक आॅफ केम्ब्रिजला गोलंदाजी केली. प्रिन्स विल्यम्सने पहिला चेंडू खेळला; परंतु दुसऱ्या चेंडूवर तो झेल देऊन बसला. त्यानंतर केटने काही हळुवार चेंडू खेळले.
प्रिन्सने चांगली फलंदाजी केली का, असे छेडल्यावर सचिन म्हणाला, ‘‘निश्चितच. त्याने चेंडूला बॅटच्या मधोमध खेळले.’’ यादरम्यान तेंडुलकरची पत्नी अंजलीदेखील ओव्हल मैदानावर उपस्थित होती.
प्रिन्स विलियम आणि केटने यादरम्यान मुंबईच्या तीन एनजीओ मॅजिक बस, डोर स्टेप स्कूल आणि इंडियास चाइल्ड लाईनच्या प्रतिनिधी आणि मुलांशी चर्चा केली.
या जोडीने एनजीओसाठी क्रिकेट बॅटवर स्वाक्षरी दिली आणि नंतर स्थानिक चॅरिटी अपनालयच्या मुलांसोबत मुंबई ओपन बस टूरचा आनंद लुटला. त्यांनी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या अकॅडमीतील मुलांशीही संवाद साधला. (वृत्तसंस्था)