सचिन, सौरव आणि लक्ष्मण कोच निवडीच्या लायकीचे नाहीत - संदीप पाटील
By admin | Published: July 14, 2017 11:55 AM2017-07-14T11:55:17+5:302017-07-14T11:55:17+5:30
बीसीससीआय सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचे चित्र आहे. भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची निवड झाल्यानंतर आता सर्वकाही ठीक होईल असे वाटत असतानाच...
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 14 - बीसीससीआय सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचे चित्र आहे. भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची निवड झाल्यानंतर आता सर्वकाही ठीक होईल असे वाटत असतानाच भारतीय संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी सीएसीवर (सचिन, सौरव आणि लक्ष्मण) प्रश्न उपस्थित केला आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, संदीप पाटील यांच्या मते सचिन, सौरव आणि लक्ष्मण यांना प्रशिक्षकपदाची निवड करण्याचा अधिकार का दिला गेला ? तिघानीही क्रिकेटमध्य़े आपली छाप टाकली आहे.ते महान खेळाडू आहेत यात काही दुमत नाही पण त्यांच्याकडे प्रशिक्षकपदाची निवड करण्याचा पुरेसा अनुभव आहे का? त्यांनी याआधी कधी प्रशिक्षकपदाचे काम केलं आहे. तर ते प्रशिक्षकपदाची निवड कोणत्या बेससवर करतात.
संदीप पाटील यांच्याप्रमाणेच आणखी एका माजी खेळाडूने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची निवडवर प्रश्न उपस्थित केला आहे. भारताचे महान फिरकी गोलंदाज इरापल्ली प्रसन्ना म्हणाले की या सर्व निवड प्रक्रियेच्या ड्रामावर नाराज आहे. शास्त्रींची निवड पहिल्यांदाच झाली होती. तर या दोन दिवसाच्या नाटकाची गरज नव्हती. त्रिमुर्तीने सरळ शास्त्रींचे नाव जाहीर करायला हवे होते.
दरम्यान, काल बीसीसीआयने भारतीय क्रिकेट संघाचे गोलंदाजी सल्लागार म्हणून झहीरची करण्यात आलेली नियुक्ती फलंदाजी सल्लागार राहुल द्रविडप्रमाणे दौरा विशेष असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आता रवी शास्त्री हे आता स्वत:च्या पसंतीच्या लोकांना सहयोगी स्टाफमध्ये ठेवण्यास आग्रही आहेत. झहीर खान गोलंदाजी कोच असतानादेखील शास्त्रींनी निकटवर्तीय भरत अरुण यांच्यासाठी फिल्डिंग लावली आहे. त्रिर्मुर्तीने निवडलेल्या सहयोगी स्टाफवर प्रशासनिक समितीने (उडअ) प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर त्यामधून आपले हात काढत त्यांची निवड ही परदेश दौऱ्यासाठी असेल असे स्पष्ट केले.
सीएसीने व्यक्त केली राय यांच्याकडे नाराजी - क्रिकेट सल्लागार समितीने (सीएसी) गुरुवारी सीओए प्रमुख विनोद राय यांना पत्र लिहून नुकताज भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदांवर कलेल्या निवडीबाबत आपली नाराजी कळवली. ह्यराहुल द्रविड आणि झहीर खान यांची नियुक्ती मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांच्यावर लादण्यात आली आहे असे दृश्य सध्या उभे केले जात आहे,ह्ण असे सीएसीने या पत्रात म्हटले आहे. सीएसीला केवळ मुख्य प्रशिक्षकाची निवड करण्याचे हक्क असताना त्यांनी त्यापलीकडे जाऊन राहुल द्रविड आणि झहीर खान यांचीही सल्लागार म्हणून निवड केली.