बॉक्स ऑफीसवर सचिनच्या बिलियन ड्रीम्सची दमदार ओपनिंग

By admin | Published: May 27, 2017 04:22 PM2017-05-27T16:22:29+5:302017-05-27T16:22:29+5:30

भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर आधारीत "सचिन..अ बिलिअन ड्रीम्स" या चित्रपटाला तिकीट बारीवर चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Sachin Tendulkar's Billiain Dreams strong opening at Box Office | बॉक्स ऑफीसवर सचिनच्या बिलियन ड्रीम्सची दमदार ओपनिंग

बॉक्स ऑफीसवर सचिनच्या बिलियन ड्रीम्सची दमदार ओपनिंग

Next

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 27 - भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर आधारीत "सचिन..अ बिलिअन ड्रीम्स" या चित्रपटाला तिकीट बारीवर चांगला प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवारी देशभरातील सिनेमा हॉलमध्ये हा चित्रपट  प्रदर्शित झाला. वेगवेगळया रिपोर्टनुसार डॉक्युमेंट्री स्टाईलचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 8.40 कोटींची कमाई केली. हिंदी, मराठी, तामिळ, तेलगु आणि इंग्रजी भाषेत हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. 
 
सचिनच्या देशभरातील चाहत्यांना डोळयासमोर ठेवून वेगवेगळया भाषेत हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधी सचिनने मुंबईत सेलिब्रिटींसाठी चित्रपटाचा विशेष स्क्रिनिंग ठेवले होते. अमिताभ, अभिषेक आणि ऐश्वर्या राय बच्चन चित्रपटाच्या स्क्रिंनिगला हजर होते. "सचिन..अ बिलिअन ड्रीम्स" पाहून अभिमान वाटला अशा शब्दात अमिताभ यांनी चित्रपटाचे कौतुक केले. सचिन फक्त एक व्यक्ती नसून त्या भारताच्या भावना आहे असे मत अभिषेक बच्चनने व्यक्त केले.  
 
सचिन..अ बिलिअन ड्रीम्स" हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त झाला आहे. क्रीडा क्षेत्रात सचिन दिलेल्या योगदानाचा सन्मान आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा चित्रपट पोहोचावा या दुहेरी उद्देशाने महाराष्ट्र सरकारने या चित्रपटावरील मनोरंजन कर माफ केला आहे. ब्रिटीश दिग्दर्शक जेम्स एर्स्किन यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. 
 
सचिनच्या आयुष्यातील अनेक माहिती नसलेल्या गोष्टी या चित्रपटातून समजणार आहेत. ओडिसा, केरळ आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये हा चित्रपट आधीच करमुक्त झाला आहे. सचिनच्या जीवनचरित्रातून राज्यातील अनेक तरुणांना प्रेरणा मिळेल या हेतून हा चित्रपट टॅक्स फ्रीचा निर्णय घेण्यात आला असे आसामचे अर्थमंत्री शशीभूषण बेहेरा यांनी सांगितले. 
 
या चित्रपटात सचिनचा बालपणापासून ते क्रिकेटचा देव बनण्यापर्यंतचा जीवन प्रवास उलगडला जाणार आहे. गेल्या वर्षी धोनीच्या आत्मकथेवर चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्या चित्रपटाला चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली होती. आता सचिनचा आत्मकथेवर आधारीत चित्रपटाची क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे. 

Web Title: Sachin Tendulkar's Billiain Dreams strong opening at Box Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.