सचिनची क्रेझ कायम
By admin | Published: June 26, 2015 01:34 AM2015-06-26T01:34:27+5:302015-06-26T01:34:27+5:30
भलेही त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असेल; मात्र आजही तो जागतिक क्रिकेटवर अधिराज्य गाजवत आहे. हा महान खेळाडू अन्य कोणी नसून भारतरत्न
मेलबर्न : भलेही त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असेल; मात्र आजही तो जागतिक क्रिकेटवर अधिराज्य गाजवत आहे. हा महान खेळाडू अन्य कोणी नसून भारतरत्न सचिन तेंडुलकर आहे. नुकताच क्रिकेट आॅस्टे्रलिया संकेतस्थळाच्या वतीने ‘२१व्या शतकातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू’ पुरस्कारासाठी घेण्यात आलेल्या आॅनलाईन स्पर्धेतून क्रिकेटचाहत्यांनी सर्वाधिक मतांनी त्याला हा बहुमान मिळवून दिला.
जगभरातील एकूण १०० दिग्गज खेळाडूंसाठी झालेल्या या स्पर्धेत सचिनने सर्वाधिक मते जिंकताना एकहाती बाजी मारली. श्रीलंकेचा दिग्गज यष्टिरक्षक फलंदाज कुमार संघकारा याला चाहत्यांनी दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मते दिली, तर आॅस्टे्रलियाचा आक्रमक यष्टिरक्षक फलंदाज अॅडम गिलख्रिस्टला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.
दरम्यान, २००हून अधिक आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळलेला सचिन या यादीमध्ये अव्वल
१० क्रमवारीतील एकमेव भारतीय खेळाडू आहे. त्याच वेळी आॅस्टे्रलियाचे सर्वाधिक ४, दक्षिण आफ्रिकेचे ३ आणि श्रीलंकेच्या २ खेळाडूंचा समावेश यामध्ये आहे. (वृत्तसंस्था)