आज धोनी मोडणार सचिनचं रेकॉर्ड

By admin | Published: October 16, 2016 08:22 AM2016-10-16T08:22:19+5:302016-10-16T08:22:19+5:30

भारताचा हा विक्रमी ९०० वा एकदिवसीय सामना असेल. या सामन्यात भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार एम.एस. धोनी नवा विक्रम करु शकतो

Sachin's record will be broken today | आज धोनी मोडणार सचिनचं रेकॉर्ड

आज धोनी मोडणार सचिनचं रेकॉर्ड

Next

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - कसोटी मालिकेत क्लीन स्वीप करणारा भारतीय संघ आजपासून न्यूझीलंडविरुद्ध सुरू होत असलेल्या पाच सामन्यांच्या वन डे मालिकेत वर्चस्व राखण्याच्या इराद्याने उतरणार आहे. भारताचा हा विक्रमी ९०० वा एकदिवसीय सामना असेल. या सामन्यात भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार एम.एस. धोनी नवा विक्रम करु शकतो. एकदिवसीय सामन्यात धोनीच्या नावावर १९२ षटकार आहे. भारताकडून ,सर्वाधिक षटकार मारामार तो दुसरा खेळाडू आहे. १९५ षटकारासह सचिन प्रथम क्रमांकावर आहे. या सामन्यात जर धोनीने ३ षटकार लगावले तर तो सचानचा विक्रम नक्कीचं मोडेल. भारतीय संघातील फलंदाजाची क्रमवारी पाहता हे शक्य असल्याचे जाणवते.

सर्वाधिक षटकार मारमाऱ्या फलंदाजाच्या क्रमवारीत धानी सहाव्या कर्मांकावर आहे. धोनीच्या नावावर १९२ षटाकर आहेत. या यादीत प्रथम क्रमांकावर पाकचा शाहीद आफ्रिदी आहे. त्याच्या नावावर ३५१ षटाकर आहेत. या मालिकेत धोनीने ८ षटाकर लगाले तर तो षटाकरांचे ट्विशतक करेल आणि या यादीत तो चौथ्या क्रमांकावर विराजमान होईल. सचिन १९५ षटाकरासह पाचव्या तर न्युझीलंडचा मॅक्युलम २०० षटकारासह चौथ्या स्थानावर आहे. श्रीलंकेचा सनथ जयसूर्या २७० षटकारांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर २३८ षटाकारांसह ख्रिस गेल तिसऱ्या स्थानावर आहे.

षटकारांशिवाय धोनीला आणखी एक विक्रम करण्याची संधी आहे. यापासून धोनी केवळ ८२ धावांनी दूर आहे. धोनीने या मालिकेत 82 धावा केल्यास 9 हजार धावांचा टप्पा पूर्ण होईल. असं झाल्यास धोनी सर्वाधिक धावा बनवणारा तिसरा विकेटकीपर असेल.

Web Title: Sachin's record will be broken today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.