सचिनचा स्ट्रेट ड्राइव्ह, टीम इंडियावर जळतात परदेशी संघ

By admin | Published: March 31, 2017 06:19 PM2017-03-31T18:19:18+5:302017-03-31T18:34:56+5:30

टीम इंडियाच्या कामगीरीवर परदेशी संघ जळतात असे मत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने व्यक्त केले आहे. 2016-17 च्या सत्रात भारतीय संघाची कामगीरी उल्लेखनीय झाली आहे

Sachin's straight drive, Team India burn on Team India | सचिनचा स्ट्रेट ड्राइव्ह, टीम इंडियावर जळतात परदेशी संघ

सचिनचा स्ट्रेट ड्राइव्ह, टीम इंडियावर जळतात परदेशी संघ

Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 31 - टीम इंडियाच्या कामगीरीवर परदेशी संघ जळतात. 2016-17 च्या सत्रात भारतीय संघाची कामगीरी उल्लेखनीय झाली आहे. या सत्रात भारताने 13 कसोटी सामन्यापैकी 10 सामने जिंकले आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाची कामगिरी उंचावत आहे. न्यूझीलंड , इंग्लंड, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया यांचा पराभव केला आहे. 2015 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या गाले कसोटीपासून भारताचा एकही कसोटी पराभव झालेला नाही हे विशेष. असे मत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने व्यक्त केले आहे.
सचिनने प्रतिस्पर्धी संघावर बोचरी टीका करत मास्टर स्ट्रोक मारला. पुढे बोलताना तो म्हणला, भारतीय संघ सध्या शक्तीशाली आहे, सर्वच स्थरावर प्रतिस्पर्धी संघापेक्षा आघाडीवर असतो. गोलंदाजी, फलंदाजी बरोबरोरच अष्टपैलू खेळाडूंमुळे भारतीय संघ संतुलित आहे. त्यामुळेच टीम इंडियावर इतर संघ जळतात. भारतीय संघ सध्या परिपक्व आहे. प्रत्येकांनी भारतीय संघाचा खेळ पाहिला असेल. सांघिक कामगिरीच्या जोरावर सध्या क्रमांक एकवर विराजमान आहे.
 
मुंबईत क्रिकेट क्लब ऑफ इंडियामध्ये काल "100एमबी" अ‍ॅपचं सचिनच्या हस्ते अनावरण करण्यात आले यावेळी तो बोलत होता. क्रिकेटच्या मैदानावर चौकार, षटकारांचे "स्फोट" घडवून शतकांचं शतक करणारा सचिन "मास्टर ब्लास्टर" म्हणून प्रसिद्ध आहे. याच शब्दांची इंग्रजी आद्याक्षरे घेऊन सचिनच्या कार्यकर्तृत्वाला साजेसं असं नाव अ‍ॅपला देण्यात आलं आहे. 27 मार्च रोजी या अ‍ॅपचा व्हिडिओ यू ट्यूबवरही अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडिओद्वारे सचिननं त्याच्या चाहत्यांशी संवाद साधला असून अ‍ॅपच्या माध्यमातून संपर्कात राहण्याचं आवाहनही केलं आहे. "सोशल मीडियावर माझ्याबद्दल येणाऱ्या सर्व प्रकारच्या बातम्या व माहिती तुम्हाला या अ‍ॅपमध्ये मिळेल, असं सचिननं म्हटलं आहे. सचिनशी सतत कनेक्ट राहण्यासाठी त्याच्या चाहत्यांना हे अ‍ॅप अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
विराट-कोहली आणि स्मिथ यांच्या वादामुळे बॉर्डर-गावस्कर मालिका अधिक चर्चा झाली. दुसऱ्या कसोटीनंतर सुरु झालेला वाद अद्याप थांबलेला दिसत नाही. ऑस्ट्रेलियन माध्यमांनी तर विराटच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. बालिश, अंहकारी आणि क्लासलेस असल्याची टीका विराटवर ऑस्ट्रेलियन माध्यमांनी केली आहे. सचिनने केलेले कौतुक भारतीय संघासाठी आगामी मालिकेसाठी नक्कीच फायद्याचे ठरेल.

Web Title: Sachin's straight drive, Team India burn on Team India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.