Sad News : कोरोनामुळे 28 वर्षीय खेळाडूचा मृत्यू; क्रीडा विश्वाला मोठा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 04:26 PM2020-05-13T16:26:32+5:302020-05-13T16:39:02+5:30
कोरोना व्हायरसमुळे 28 वर्षीय खेळाडूला आपले प्राण गमवावे लागले
जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या ही 43 लाख 43,251 वर पोहोचली आहे. त्यापैकी 16 लाख 04,559 रुग्ण बरे झाले असले तरी 2 लाख 92, 913 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. बुधवारी क्रीडा विश्वाला चटका लावणारी बातमी समोर आली. कोरोना व्हायरसमुळे 28 वर्षीय खेळाडूला आपले प्राण गमवावे लागले आणि क्रीडा विश्वासाठी हा मोठा धक्का म्हटलं जात आहे.
महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत Rohit Sharmaचं महत्त्वाचं विधान
ट्वेंटी-20तील जलद अर्धशतकाचा विक्रम कोण मोडणार? युवराज सिंगनं सांगितली दोन नावं
जपानमध्ये कोरोनाचे 15968 रुग्ण आहेत आणि 657 जणांचा मृत्यू झाला आहे. 8531 जण बरी झाली आहेत. बुधवारी जपानचा 28 वर्षीय सुमो कुस्तीपटू शोबूशी याला कोरोनामुळे प्राण गमवावे लागले. जपान सुमो असोसिएशननं ही दुःखद बातमी दिली. कियोटाका सुएटाके असं या सुमो कुस्तीपटूचं खरं नाव आहे. 4 एप्रिलला त्याला ताप आला होता आणि त्यानंतर त्याला उपचार मिळण्यासाठी वेळ लागला. 8 एप्रिलला त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले.
19 एप्रिलपासून तो ICUमध्ये होता. त्याची प्रकृती खालावली आणि बुधवारी त्याचं निधन झाले. ''त्यानं या व्हायरसचा सामना केला, महिनाभर त्यानं त्रास सहन केला. मात्र, या लढाईत त्याचा पराभव झाला. त्याच्या आत्म्याला शांती मिळो,'' असे जपान सुमो असोसिएशननं त्यांच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
शोबूशीनं 2007मध्ये व्यावयसायिक स्पर्धेत पदार्पण केलं. त्यानं सँडन्मे विभागात 11 व्या क्रमांकापर्यंत मजल मारली होती. तो ताकाडागावा येथील होता आणि मागील महिन्यात ताकाडागावा येथील सुमो प्रशिक्षकालाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. आतापर्यंत सुमो असोसिएशनच्या सहा सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
यापूर्वी सुमो असोसिएशननं जुलै मध्ये होणारी ग्रँड सुमो स्पर्धा रद्द केली होती आणि त्याचं ठिकाणही बदललं होतं. ही स्पर्धा टोक्यो रायोगोकू कोकुजिकान स्टेडियमवर बंद दरवाजात होणार आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
आत्मनिर्भर भारत'; पंतप्रधान मोदींचा अखेरच्या चेंडूवर षटकार; बबिता फोगाटचं ट्विट व्हायरल
... तर हार्दिक पांड्याला 10 वाजता ड्रिंक्ससाठी घेऊन गेलो असतो; रवी शास्त्रींना Yuvraj Singhचा सल्ला
'माझ्या घरावर दगडफेक करण्यात आली होती'; तो प्रसंग आठवून युवराज सिंग भावुक
सानिया मिर्झा ट्राऊझर? सोशल मीडियावर होतेय व्हायरल; Video पाहून व्हाल लोटपोट
वीरेंद्र सेहवागच्या प्रश्नांवर Sunny Leoneची जोरदार फटकेबाजी; दोघांनी केलेली एकत्रित कॉमेंट्री
बांगलादेशच्या क्रिकेटपटूला कोरोनाची लागण, छातीत दुखू लागल्यानं डॉक्टरांकडे धाव
कसा असेल MI-CSKचा एकत्रित संघ?; रोहित शर्मा, सुरेश रैनानं निवडले खेळाडू