साहा-पुजाराच्या त्रिशतकी भागिदारीच्या जोरावर शेष भारताने जिंकला इराणी चषक

By admin | Published: January 24, 2017 04:59 PM2017-01-24T16:59:27+5:302017-01-24T16:59:27+5:30

भारतीय कसोटी संघात आपली दावेदारी मजबूत करण्याच्या प्रयत्नात असलेल्या यष्टीरक्षक वृद्धिमान साहाने येथे सुरु असलेल्या इराणी चषकाच्या सामन्यात दमदार द्विशतकी खेळी केली

Saha Pujara triumphed on the other hand, India won the Irani Cup | साहा-पुजाराच्या त्रिशतकी भागिदारीच्या जोरावर शेष भारताने जिंकला इराणी चषक

साहा-पुजाराच्या त्रिशतकी भागिदारीच्या जोरावर शेष भारताने जिंकला इराणी चषक

Next

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - भारतीय कसोटी संघात आपली दावेदारी मजबूत करण्याच्या प्रयत्नात असलेल्या यष्टीरक्षक वृद्धिमान साहाने येथे सुरु असलेल्या इराणी चषकाच्या सामन्यात दमदार द्विशतकी खेळी केली. रणजी चॅम्पियन गुजरातने दिलेल्या 379 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शेष भारत संघांने पहिल्या चार विकेट अवघ्या 63 धावांत गमवाल्या होत्या. त्यानंतर साहा आणि पुजारा यांनी टिच्चून फलंदाजी करताना विजय विजय मिळवला.

पहिले चार फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर साहाने कर्णधार चेतेश्वर पुजाराच्या साथीने पाचव्या विकेटसाठी 316 धावांची अभेद्य भागीदारी रचून शेष भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

सहा-पुजाराच्या त्रिशतकी भागिदारीत रिद्धिमान साहाचा नाबाद 203 धावांचा वाटा होता. त्याने 272 चेंडूंमधली ही खेळी 26 चौकार आणि सहा षटकारांनी सजवली. चेतेश्वर पुजाराने 238 चेंडूंत 16 चौकारांसह 116 धावांची खेळी उभारली.

दरम्यान, काल गुजरातने सकाळी आपला डाव घोषित केल्यानंतर विजयासाठी ३७९ धावांचे मुश्किल आव्हान मिळालेल्या शेष भारत संघाची सुरुवात चांगली झाली नाही. अखिल हेरवाडकर (२0) आणि अभिनव मुकुंद (१९) हे दोघे चांगली सलामी देण्यास अपयशी ठरले. इंग्लंडविरुध्द त्रिशतक करणारा करुण नायर (७) पुन्हा एकदा स्वस्तात बाद झाला. त्रिशतकानंतरच्या चार डावात त्याने पन्नाशीही पार केलेली नाही. मनोज तिवारीही ७ धावांवर बाद झाल्याने शेष भारतचा डाव ४ बाद ६३ असा अडचणीत आला. यानंतर मैदानात पुजारा आणि साहा यांची जोडी जमली, आणि त्यांनी विजय खेचून आणला.

Web Title: Saha Pujara triumphed on the other hand, India won the Irani Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.