नौकानयनपटू विष्णू सरवनन पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 08:15 AM2024-02-01T08:15:53+5:302024-02-01T08:16:44+5:30
Vishnu Saravanan: आशियाई स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारा विष्णू सरवनन हा सलग दोन ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा पहिला नौकानयनपटू ठरला आहे. त्याने बुधवारी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या माध्यमातून पॅरिस ऑलिम्पिकमधील स्थान निश्चित केले.
ॲडलेड : आशियाई स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारा विष्णू सरवनन हा सलग दोन ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा पहिला नौकानयनपटू ठरला आहे. त्याने बुधवारी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या माध्यमातून पॅरिस ऑलिम्पिकमधील स्थान निश्चित केले.
मुंबईतील आर्मी नेव्हिगेशन नोडमध्ये सुभेदार असलेला २४ वर्षीय सरवनन याने आयएलसीए-सात जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत १५२ प्रतिस्पर्धींमध्ये २६वे स्थान मिळवताना पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्रता निश्चित केली. पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा तो पहिला भारतीय नौकानयनपटू आहे. सरवनन आशियाई खेळाडूंमध्ये अव्वल स्थानावर आहे. त्याने आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता सिंगापूरच्या खेळाडूला मागे टाकले. सरवननने एकूण १७४ गुण मिळविले.
मानक नियमांनुसार किमान ४९ गुण हटविल्याने सरवननचे निव्वळ गुण १२५ झाले. तो २१ वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेता आहे.