सायना पुन्हा नंबर 1
By admin | Published: August 20, 2015 11:40 PM2015-08-20T23:40:14+5:302015-08-20T23:40:14+5:30
जकार्ता येथे नुकत्याच आटोपलेल्या विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये अंतिम सामन्यात सायनाला मारिनने पराभूत केले होते. आॅलिम्पिक कांस्य विजेती
जकार्ता येथे नुकत्याच आटोपलेल्या विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये अंतिम सामन्यात सायनाला मारिनने पराभूत केले होते. आॅलिम्पिक कांस्य विजेती सायना गुरुवारी जाहीर झालेल्या बीडब्ल्यूएफच्या रँकिंगमध्ये ८२७९२ गुणांसह अव्वल स्थानावर पोहोचली.
या आधी इंडियन ओपन जिंकल्यानंतर सायना एक मार्च रोजी अव्वल स्थानावर दाखल झाली होती. नंतर लवकरच माघारली; पण मे महिन्यात पुन्हा नंबर वन बनली. जूनमध्ये कॅरोलिनाने सायनाला मागे टाकले होते.
पुरुष एकेरीत पारुपल्ली कश्यप आठव्या स्थानावर आला आहे. महिला दुहेरीत ज्वाला गुट्टा- अश्विनी पोनप्पा यादेखील दहाव्या स्थानावर झेपावल्या आहेत.
इंडियन ओपन विजेता के श्रीकांत हा एका स्थानाने घसरून चौथ्या स्थानावर आला आहे. दोन वेळा विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्य जिंकणारी पी.व्ही. सिंधू १४व्या स्थानी आहे. मिश्र दुहेरीत मात्र पहिल्या २५ खेळाडूंत एकही भारतीय नाही.