सायना-सिंधू लढत होण्याची शक्यता

By admin | Published: September 1, 2015 12:02 AM2015-09-01T00:02:19+5:302015-09-01T00:02:19+5:30

भारतीय महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पी.व्ही. सिंधू यांच्यादरम्यान पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या जपान ओपन सुपर सिरीज स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत लढत

Saina and Sindhu are likely to face the match | सायना-सिंधू लढत होण्याची शक्यता

सायना-सिंधू लढत होण्याची शक्यता

Next

टोकियो : भारतीय महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पी.व्ही. सिंधू यांच्यादरम्यान पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या जपान ओपन सुपर सिरीज स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत लढत होण्याची शक्यता आहे. पण, त्यासाठी उभय खेळाडूंनी पहिल्या फेरीचा अडथळा पार करणे आवश्यक आहे.
विश्व चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदकाचा मान मिळविणाऱ्या सायनाला सलामीला जागतिक क्रमवारीत १७व्या स्थानावर असलेल्या थायलंडच्या बुसानन ओंगबुमरंगपानविरुद्ध खेळावे लागेल. विश्व चॅम्पियनशिपमध्ये दोनदा कांस्यपदकाचा मान मिळवणाऱ्या सिंधूला पहिल्या फेरीत जपानच्या मिनात्सू मितानीच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. ८ ते १३ सप्टेंबर या कालावधीत रंगणाऱ्या या सुपर सिरीज स्पर्धेच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय पातळीवर सायना व सिंधू यांच्यादरम्यान दुसऱ्यांदा लढत होण्याची शक्यता आहे. यापूर्वी २०१४मध्ये इंडिया ग्रांप्री गोल्ड स्पर्धेच्या अंतिम फेरीत फेरीत उभय खेळाडूंदरम्यान लढत झाली होती. त्यात सायनाने बाजी मारली होती. यंदा इंडोनेशिया ओपन सुपर सिरीज स्पर्धेत उभय खेळाडूंदरम्यान उपांत्य फेरीत गाठ पडण्याची शक्यता होती.
अन्य भारतीय खेळाडूंमध्ये चौथे मानांकन प्राप्त किदाम्बी श्रीकांत पुरुष एकेरीमध्ये मानांकन असलेला एकमेव भारतीय खेळाडू आहे. त्याला सलामी लढतीत आयर्लंडच्या स्कॉट इव्हांसच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. राष्ट्रकुल चॅम्पियन पारुपल्ली कश्यपची पहिल्या फेरीत गाठ ताकुमा युएडाविरुद्ध पडेल, तर डच ओपनविजेता अजय जयराम याला सातवे मानांकनप्राप्त डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सेलसेनच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. एच.एस. प्रणय हाँगकाँगच्या वोंग विंग की विन्सेटविरुद्ध खेळणार आहे. महिला दुहेरीमध्ये ज्वाला गुट्टा व अश्विनी पोनप्पा यांना पहिल्या फेरीत आठव्या मानांकित चीनच्या झाओ युनलेई व झोंग कियांशिन यांच्याविरुद्ध खेळावे लागेल. (वृत्तसंस्था)

Web Title: Saina and Sindhu are likely to face the match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.