सायनाची आयओसीच्या सदस्यपदी निवड हुकली
By admin | Published: August 19, 2016 11:01 PM2016-08-19T23:01:14+5:302016-08-19T23:01:14+5:30
दिग्गज बॅडमिंटनपटू सायना नेहवालची आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीच्या चार सदस्यांमध्ये निवड होऊ शकली नाही.
ऑनलाइन लोकमत
रिओ, दि . १९ : दिग्गज बॅडमिंटनपटू सायना नेहवालची आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीच्या चार सदस्यांमध्ये निवड होऊ शकली नाही. कारण विश्व अॅथ्लेटिक्स आयोगाच्या शर्यतीत ती सहाव्या स्थानावर राहिली. सायनाला एकूण १२३३ मते मिळाली. रिओ आॅलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना मत देण्याचा अधिकार होता. चार जागांसाठी जगभरातून नामांकित
करण्यात आलेल्या २३ खेळाडूंमध्ये सायनाचा समावेश होता.
लंडन आॅलिम्पिकमध्ये कांस्यपदकाची मानकरी ठरलेल्या सायनाना महिला एकेरी बॅडमिंटन स्पर्धेच्या गट साखळीतच पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे रिओ आॅलिम्पिकमधून सायनाचे आव्हान संपुष्टात आले. ही निवडणूक आॅलिम्पिक क्रीडा ग्राममध्ये २५ दिवसांमध्ये संपन्न झाली.
आयओसी सत्राच्या मंजुरीनंतर चार खेळाडूंची आठ वर्षांसाठी आयओसीच्या सदस्यपदी निवड होईल. बीजिंग आॅलिम्पिकचा सुवर्णपदक विजेता जर्मनीचा ब्रिट्टा हेडमॅनला १६०३, दक्षिण कोरियाचा दिग्गज टेबल टेनिसपटू सियोंग-मिन-रयूला १५४४, हंगेरीचा माजी जलतरणपटू डॅनियल ग्युर्टाला १४६९ आणि रशियाच्या येलेना इसिनबायेवाला १३६५ असे मते मिळाली. या सर्वांची आयओसीच्या सदस्यपदी निवड झाली. रिओ आॅलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या ११,२४५ खेळाडूंपैकी ५,१८५ खेळाडू
मतदानामध्ये सहभागी झाले