मलेशिया ओपनच्या सेमीफायनलमध्ये सायना पराभूत

By admin | Published: April 9, 2016 12:50 PM2016-04-09T12:50:35+5:302016-04-09T12:52:50+5:30

भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिचे मलेशिया सुपर सीरिज स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये पराभव झाल्याने तिचे आव्हान संपुष्टात आले.

Saina loses in Malaysia Open semis | मलेशिया ओपनच्या सेमीफायनलमध्ये सायना पराभूत

मलेशिया ओपनच्या सेमीफायनलमध्ये सायना पराभूत

Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
क्वालालांपूर, दि. ९ - भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिचे मलेशिया सुपर सीरिज स्पर्धेतील आव्हान शनिवारी संपुष्टात आले. चीनच्या तै त्झु यिंग हिने सायनाचा सेमीफायनलमध्ये पराभव केल्याने सायना स्पर्धेच्या बाहेर पडली. 
शनिवारी पार पडलेल्या सेमीफायनलमध्ये यिंगने ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ मेडल पटाकवणा-या सायनाचा १९-२१, १३-२१ असा सरळ पराभव करत तिला बाहेरचा रस्ता दाखवला. आत्तापर्यंत यिंग व सायनाचा १२ वेळा मुकाबला झाला असून सायनाला ९ वेळा पराभव पत्करावा लागला आहे. 

Web Title: Saina loses in Malaysia Open semis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.