सायना दुसऱ्या फेरीत पराभूत, श्रीकांतची माघार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2021 12:47 AM2021-01-15T00:47:16+5:302021-01-15T00:47:35+5:30

थायलंड ओपन : सात्त्विक-रंकीरेड्डी दुहेरीतून बाद, भारताचे आव्हान संपुष्टात

Saina loses in second round, Srikanth withdraws | सायना दुसऱ्या फेरीत पराभूत, श्रीकांतची माघार

सायना दुसऱ्या फेरीत पराभूत, श्रीकांतची माघार

Next

बॅंकॉक : स्टार खेळाडू सायना नेहवालला थायलंड ओपन सुपर १००० बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीत दुसऱ्या सामन्यात गुरुवारी पराभवाचे तोंड पहावे लागले. यजमान देशाची खेळाडू बुसानन ओंगबामरंगफान हिच्याकडून सायना ६८ मिनिटांत २३-२१, १४-२१,१६-२१ ने पराभूत झाली. सायनाने पहिला गेम जिंकला होता, हे विशेष. जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानावर असलेल्या बुसाननकडून सायना सलग चौथ्यांदा पराभूत झाली आहे.
पुरुष एकेरीत जागतिक क्रमवारीतील माजी नंबर वन कीदाम्बी श्रीकांतने उजव्या पायाच्या पोटरीचे स्नायू ताणले गेल्यामुळे आठवा मानांकित मलेशियाचा ली जी जिया याला दुसर्या फेरीत वॉक आोव्हर दिला.

त्याआधी पुरुष दुहेरीत भारताचे सात्त्वक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी हे इंडोनेशियाची जोडी मोहम्मद अहसान आणि हेंड्रा सेनियावान यांच्याकडून १९-२१, १७-२१ ने पराभूत होताच स्पर्धेबाहेर पडले. सायना आणि बुसानन यांनी लांबच लांब रॅलीज खेळण्यावर भर दिला होता. स्थानिक खेळाडूने उत्कृष्ट फटके मारुन लाभ घेतला. पहिल्या गेममध्ये सायनाने बुसाननवर ११-९ अशी आघाडी संपादन केली होती. मात्र नंतर लढत १७-१७ अशी बरोबरीत आली. बुसाननचा परतीचा फटका नेटवर आदळताच सामनाने पहिल्या मेगमध्ये बाजी मारली. दुसऱ्या गेममध्ये सायनाने केलेल्या चुकांचा प्रतिस्पर्धी खेळाडूुला लाभ झाला. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये बुसासनने सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवले. सायनाने मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला. बुसाननला सहावेळा मॅच पाईंट मिळाले. मात्र, सायनाला केवळ दोनदा बचाव करण्यात यश आल्याने गेम आणि सामना गमवावा लागला.

भारताचे आव्हान संपुष्टात
आघाडीच्या खेळाडूंच्या पराभवानंतर सात्त्विक साईराज आणि अश्विनी पोनप्पा या मिश्र जोडीवर नजर होती. ही जोडी हॉंगकॉंगचे चांग ताक चिंग आणि नग विंग यंग यांच्याकडून १२-२१, १७-२१ ने पराभूत होताच स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे.

Web Title: Saina loses in second round, Srikanth withdraws

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.