सायना IOC अॅथलिट्स कमिशनच्या सदस्यपदी
By admin | Published: October 18, 2016 02:00 PM2016-10-18T14:00:25+5:302016-10-18T14:10:29+5:30
भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (IOC ) अॅथलिट्स कमिशनच्या सदस्यपदी सायनाची निवड करण्यात आली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 18 - भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (IOC ) अॅथलिट्स कमिशनच्या सदस्यपदी सायनाची निवड करण्यात आली आहे.
यासंदर्भात आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाख यांनी पाठवलेले पत्र काल रात्री सायनाला मिळाले. 'सायना, आम्ही अत्यंत सन्मानाने तुझी आयओसीच्या अॅथलिट्स कमिशनच्या सदस्यपदी नियुक्ती करत आहोत', असे आयओसीने आपल्या पत्रात म्हटले आहे. या अॅथलिट्स कमिशनचे अध्यक्षपद अँजेला रुजारिओ भूषवत असून, या कमिशनमध्ये नऊ उपाध्यक्ष आणि दहा सदस्य आहेत. या कमिशनची पुढील बैठक 6 नोव्हेंबला होणार आहे.
दरम्यान, सायनाच्या आयओए अॅथलिट्स कमिशनच्या सदस्यपदी झालेल्या निवडीबद्दल सायनाचे वडील हरवीर सिंग यांनी आनंद व्यक्त केला आहे. 'सायनाची आयओसी अॅथलिट कमिशनच्या सदस्यपदी निवड झाल्याचे वाचून मी भावनिक झालो आहे. ही बाब आमच्यासाठी सन्माननीय अशी आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये दुखापतीमुळे तिचे पदक हुकले. मात्र तरीही आम्हाला आमच्या मुलीचा अभिमान आहे,' असे ते म्हणाले .