सायना नेहवालला अग्रमानांकन
By admin | Published: March 14, 2017 12:47 AM2017-03-14T00:47:56+5:302017-03-14T00:47:56+5:30
भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिला मंगळवारपासून (दि.१४)सुरू होणाऱ्या योनेक्स स्विस ओपन स्पर्धेत महिला गटातील अव्वल मानांकन प्राप्त झाले आहे
बासेल (स्वीत्झर्लंड) : भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिला मंगळवारपासून (दि.१४)सुरू होणाऱ्या योनेक्स स्विस ओपन स्पर्धेत महिला गटातील अव्वल मानांकन प्राप्त झाले आहे. दुखापतीमुळे बऱ्याच दिवसांपासून कोर्टपासून दूर असलेली सायना आता पुनरागमन करीत आहे. सायना सध्या विश्व मानांकनात नवव्या क्रमांकावर आहे. या स्पर्धेत महिला गटात खेळणारी सायना जगातील पहिल्या दहा खेळाडूंमधील एकमेव स्पर्धक आहे. त्यामुळे तिला विजेतेपदाच्या दावेदार मानल्या जात आहे.
याआधी, सायना नेहवाल आॅल इंग्लंड ओपन चॅम्पियनशीपच्या उपांत्यपूर्व फेरीतपोहचली होती. स्विस ओपनमध्ये इतर भारतीय खेळाडूंमध्ये पुरुष एकेरीत अजय जयराम याला तिसरे तर एच.एस. प्रनॉय याला
पाचवे मानांकन प्राप्त झाले आहे. सध्या शानदार फॉर्ममध्ये असलेल्या समीर वर्मा याला १३ वे मानांकन प्राप्त झाले आहे. मिश्र दुहेरी गटात
प्रणव जेरी चोपडा आणि एन. सिक्की रेड्डी या भारतीय चौथ्या मानांकित जोडीवर बरीच आशा आहे. मंगळवारी स्पर्धेतील क्वालिफिकेशन राउंड होतील. त्यानंतर मुख्य फेरीला सुरुवात होईल. (वृत्तसंस्था)