सायना नेहवाल उपांत्यपूर्व फेरीत

By admin | Published: April 8, 2016 03:21 AM2016-04-08T03:21:02+5:302016-04-08T03:21:02+5:30

सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू या भारताच्या दोन्ही स्टार बॅडमिंटनपटूंनी आपापल्या सामन्यात बाजी मारताना मलेशिया ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला

Saina Nehwal quarter-final | सायना नेहवाल उपांत्यपूर्व फेरीत

सायना नेहवाल उपांत्यपूर्व फेरीत

Next

शाह आलम : सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू या भारताच्या दोन्ही स्टार बॅडमिंटनपटूंनी आपापल्या सामन्यात बाजी मारताना मलेशिया ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सायनाने कोरियाच्या बेई यिओन जूचा पाडाव केला. तर, सिंधूनेदेखील कोरियाच्याच सुंग जी नूला नमवले.
जागतिक क्रमवारीत ८व्या स्थानी असलेल्या सायनाने एकतर्फी झालेल्या सामन्यात बेई जू हिला केवळ ३२ मिनिटांमध्ये २१-१०, २१-१६ असे लोळवले. पहिला सेट सहजपणे जिंकल्यावर सायनाला दुसऱ्या सेटमध्ये चांगली लढत मिळाली. मात्र, मोक्याच्यावेळी खेळ उंचावताना सायनाने बेई जूला स्पर्धेतील गाशा गुंडाळण्यास भाग पाडले. उपांत्यपूर्व फेरीत सायनापुढे थायलंडच्या पोर्नटिप बुरानप्रासर्तसुकचे कडवे आव्हान असेल.
दुसऱ्या बाजूला सिंधूला विजयी कूच करण्यासाठी कडव्या लढतीस सामोरे जावे लागले. सुंग जीने सिंधूला प्रत्येक गुणासाठी झुंजवले. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या पहिल्या सेटमध्ये सिंधूने ९-६ अशी आघाडी घेतली होती. मात्र, सुंग जीने तिला १०-१० असे बरोबरीत आणले. यानंतर १७-१८ अशा पिछाडीवरून सिंधूने २०-१८ अशी आघाडी घेतली. मात्र, पुन्हा एकदा सुंग जीने २०-२० अशी बरोबरी साधत चुरस निर्माण केली. या वेळी सिंधूने कोणतीही चूक न करता २२-२० अशा गुणांनी पहिला सेट जिंकून सामन्यात आघाडी घेतली.
दुसऱ्या सेटमध्येही दोन्ही खेळाडूंमध्ये चुरशीचा खेळ झाला.
१५-१५ अशी बरोबरी असताना
सलग ५ गुणांची कमाई करताना सिंधूने २०-१५ अशी आघाडी
घेतली. यानंतरही सिंधूला झगडावे लागले आणि अखेर तिने २१-१७ अशी बाजी मारत स्पर्धेत अंतिम ८ खेळाडूंमध्ये स्थान मिळवले. उपांत्यपूर्व फेरीत सिंधूला थायलंडच्या रत्चानोक इंतानोन विरुद्ध दोन हात करावे लागेल. (वृत्तसंस्था)

Web Title: Saina Nehwal quarter-final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.