सायना नेहवाल उपांत्यपूर्व फेरीत

By admin | Published: January 20, 2017 05:27 AM2017-01-20T05:27:56+5:302017-01-20T05:27:56+5:30

सायना नेहवाल आणि अजय जयराम यांनी मोसमातील पहिल्या मलेशियन मास्टर्स ग्रँड प्रीक्स गोल्डची गुरुवारी उपांत्यपूर्व फेरी गाठली.

Saina Nehwal quarter-final | सायना नेहवाल उपांत्यपूर्व फेरीत

सायना नेहवाल उपांत्यपूर्व फेरीत

Next


सारावाक : स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि अजय जयराम यांनी मोसमातील पहिल्या मलेशियन मास्टर्स ग्रँड प्रीक्स गोल्डची गुरुवारी उपांत्यपूर्व फेरी गाठली. लंडन आॅलिम्पिकची कांस्य विजेती, माजी नंबर वन सायनाने इंडोनेशियाची हाना रामादिनी हिच्यावर २१-१७, २१-१२ ने विजय नोंदविला. सायनाला आता इंडोनेशियाची आठवी मानांकित फिलियानी फित्रयानी विरुद्ध खेळावे लागेल. सहावी मानांकित जयरामने चायनीज तायपेईचा २१-१२, १५-२१, २१-१५ ने पराभव केला. महिला दुहेरीत अपर्णा बालन आणि प्राजक्ता सावंत या जोडीला दुसरी मानांकित जोडी चायनीज तायपेईची चियांग केइ सिन-हुंग हिश हान यांनी २१-१८, २१-१४ ने पराभूत केले.
पुरुष दुहेरीत आॅलिम्पिक खेळलेला मन्नू अत्री-बी सुमित रेड्डी या तिसऱ्या मानांकित जोडीला इंडोनेशियाची जोडी हेंड्रा गुनावन-मार्किस किडो यांच्याकडून १७-२१, २१-१८, १२-२१ ने पराभवाचा धक्का बसला. अर्जुन एम. आर. आणि रामचंद्र श्लोक यांना हाँगकाँगचे चेकऊ हिम व ली चून हेई यांनी २१-१४, २१-१७ ने नमविले.
मिश्र दुहेरी प्रकारात भारताच्या प्राजक्ता सावंत-योगेंद्र कृष्णा यांना सिंगापूरचे योंग टेरी आणि हान तान यांच्याकडून २१-१७, २१-१७ ने पराभवाचा धक्का बसला. भारताची सुपरस्टार जोडी ज्वाला गुट्टा-मनु अत्री यांना इंडोनेशियाचे तोंतोवी अहमद-ग्लोरिया इमान्यूएल यांनी २१-१८, २१-१० ने नमविले. (वृत्तसंस्था)

Web Title: Saina Nehwal quarter-final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.