सरकारचे बॅडमिंटन खेळाडूंना पूर्ण सहकार्य: सायना नेहवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 08:20 AM2021-07-19T08:20:01+5:302021-07-19T08:20:34+5:30
भारतात फक्त क्रिकेटच प्रसिद्ध झाले असे नाही. गेल्या दशकातील हा सर्वात मोठा बदल आहे.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये आम्ही आमच्या खेळाचा ठसा उमटवू शकतो. भारताचे बरेच खेळाडू जागतिक पातळीवर बऱ्याच खेळांमध्ये चांगली कामगिरी करतात. भारतात फक्त क्रिकेटच प्रसिद्ध झाले असे नाही. गेल्या दशकातील हा सर्वात मोठा बदल आहे. त्याचे चांगले निकाल मिळवल्याने हे होऊ शकले.
मी हे मान्य केले पाहिजे की, एक खेळाडू म्हणून मी व्यस्त होते. मला व्यवस्थेकडे जाऊन इतर बाबींसाठी वेळ नव्हता. मात्र हा गेल्या काही वर्षातील हा सकारात्मक बदल आहे. जगभर खेळासाठी म्हणून प्रवास करतांना सरकारने आर्थिकदृष्ट्या सहकार केले. टार्गेट ऑलिम्पिक पोडिअम स्किम (टॉप्स) २०१४-१५ मध्येच सुरू करणे हे मोठे पाऊल होते. एक वेळ होती की आम्हाला काही क्रीडा साहित्य लागले तर ते एनजीओकडे मागावे लागत होते. मात्र आता टॉप्समधून मदत मिळवणे खेळाडूंना सोपे झाले आहे. दर महिन्याला मिळणारा निधी हे मोठे पाऊल ठरले. त्यामुळे प्रशिक्षण, डाएट, आणि स्पर्धांना जाणे सोपे झाले आहे.
एक चांगली बाब म्हणजे खेळाडूंशी संपर्क आणि त्यांना खेळाकडे लक्ष देण्यास प्रोत्साहन देणे, त्यांचा सराव आणि साहित्यामुळे ते चांगली टक्कर देऊ लागले आहेत. मी हे म्हणू शकते की प्रत्येक वर्षीही व्यवस्था चांगली होत आहे. आम्ही नशिबवान आहोत की गेल्या १० ते १५ वर्षात भारताकडे चांगले खेळाडू तयार झाले आहेत. मी हे नमूद करायला हवे की, लोकांनी मला भारतीय बॅडमिंटनमध्ये पायोनियर म्हणून बघितले. आणि आता अव्वल ५० मध्ये अनेक भारतीय खेळाडू आहेत. प्रामाणिकपणे सांगायचे तर मी खेळाची मोठी चाहती नव्हते. मी खेळायला सुरूवात केली तेव्हा मी ऑलिम्पिकला फार महत्त्व दिले नाही. पण २००८ बिजींगसाठी जेव्हा मी निवडले गेले. तेव्हा मी उत्साहित झआले होते. मला युवा खेळाडू म्हणून देशासाठी काहीतरी करून दाखवण्याची संधी होती. मी तेथे पदक जिंकू शकले असते पण मला विश्वास होत नाही मी इंडोनेशियाच्या मारिया युलिन्तीविरोधात उपांत्यपुर्व फेरीतील तिसऱ्या गेममध्ये ११-३ असा कसा गमावला. त्यावेळी अपेक्षांचे ओझे नव्हते.
पण मला ऑलिम्पिक पोडिअमची किंमत कळली. आणि देशाचा झेंडा वर जातांना कसे वाटते हे देखील कळले. मी नंतर लंडन ऑलिम्पिक २०१२ ला कांस्य पदक जिंकले. ती माझी दुसरी ऑलिम्पिक स्पर्धा होती. मला हे कळले की ऑलिम्पिकच्या तयारीसाठी मला खुप जास्त स्पर्धा खेळाव्या लागतील. मी स्वत:ला सुपर सिरीज इव्हेंट्समध्ये सिद्ध केले. त्यानंतर २०१० मध्ये तीन पदके मिळवली. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला.
(सायना नेहवाल ही भारताची २०१२ ची ऑलिम्पिक कांस्य पदक विजेती खेळाडू आहे.)