सायना नेहवालनं दुसऱ्यांदा जिंकलं ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सीरिजचं जेतेपद.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2016 02:21 PM2016-06-12T14:21:54+5:302016-06-12T16:52:34+5:30
भारतीय स्टार सायना नेहवाल हिने आज महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात चीनच्या सन यू हिचा पराभव करीत ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
Next
ऑनलाइन लोकमत
सिडनी, दि. १२ : भारतीय स्टार सायना नेहवाल हिने आज महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात चीनच्या सन यू हिचा पराभव करीत ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या विजयासह या मोसमातील तिचं हे पहिलचं जेतेपद आहे. तर दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सीरिजचंच्या जेतेपदीवर नाव केरलं .
सायनाची कामगिरी रिओ ऑलिम्पिकआधी उत्साहात भर घालणारी असून, याद्वारे तिने आपण ऑलिम्पिकसाठी फिट असल्याचे संकेतही दिले. शनिवारी २०११ ची विश्व चॅम्पियन आणि २०१२ ची ऑलिम्पिक रौप्य विजेती विहानला सायनाने अर्ध्या तासात २१-८, २१-१२ ने पराभूत करत अंतिम सामन्यात धडक मारली होती.
लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य जिंकणाऱ्या सायनने अंतिम लढतीत चीनची १२ व्या क्रमांकावरील सून यू हिचा ३ सेटमध्ये सरळ पराभव केला. चुरशीच्या सामन्यात सून यूने पहिला सेट ११-२१ ने जिंकत सामन्यात आघाडी घेतली होती. पण भारताची बॅडमिंटन क्वीन सायना नेहवालने सामन्यात धमाकेदार पुनराअग्मन करत दोन्ही सेट जिंकत विजय खेचून आणला. सायनाने चुरशीच्या सामन्यात ११-२१, २१-१४, २१-१९ असा जिगरबाज विजय मिळवला.