सायनाची माघार; भारतीय संघाला झटका
By admin | Published: July 19, 2014 02:03 AM2014-07-19T02:03:17+5:302014-07-19T02:03:17+5:30
लंडन आॅलिम्पिकमध्ये कांस्यपदक आणि गेल्या महिन्यात आॅस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद जिंकणाऱ्या २४ वर्षीय सायनाने माघारी घेण्यात दुसरे कोणतेही मोठे कारण नाही
नवी दिल्ली : भारताची स्टार खेळाडू सायना नेहवालने पायाला दुखापत झाल्यामुळे आणि या स्पर्धेसाठी योग्य तयारी झाली नसल्यामुळे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे भारतीय बॅडमिंटन संघाला झटका बसला आहे. या स्पर्धेत सायनाकडे सुवर्णपदकाची दावेदार म्हणून पाहिले जात होते.
लंडन आॅलिम्पिकमध्ये कांस्यपदक आणि गेल्या महिन्यात आॅस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद जिंकणाऱ्या २४ वर्षीय सायनाने माघारी घेण्यात दुसरे कोणतेही मोठे कारण नाही. आॅस्ट्रेलियन ओपन नंतर पायाला दुखापत झाल्यामुळे मनासारखा सराव करू शकले नसल्याचे वृत्तसंस्थेला सांगितले. दरम्यान, दुसरीकडे मलेशियाची नंबर एकची खेळाडू ली चोंग वेईनेसुद्धा दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घेतली आहे. दोन वेळा राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या ली चोंग वेईला थॉमस चषक स्पर्धेच्या वेळी दुखापत झाली होती. (वृत्तसंस्था)