सायना, सिंधू उपांत्यपूर्व फेरीत
By Admin | Published: March 10, 2017 06:22 AM2017-03-10T06:22:58+5:302017-03-10T06:22:58+5:30
भारताची आघाडीची खेळाडू आॅलिम्पिक रौप्यविजेती पी. व्ही. सिंधू तसेच सायना नेहवाल यांनी गुरुवारी सहज विजयासह आॅल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी
बर्मिंगहॅम : भारताची आघाडीची खेळाडू आॅलिम्पिक रौप्यविजेती पी. व्ही. सिंधू तसेच सायना नेहवाल यांनी गुरुवारी सहज विजयासह आॅल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. एच. एस. प्रणय मात्र दुसऱ्याच फेरीत पराभूत झाल्याने पुरुष एकेरीत भारताचे आव्हान संपुष्टात आले.
सिंधूने इंडोनेशियाची दिनार दयाह अयुस्टिन हिचा अर्ध्या तासात २१-१२, २१-४ ने पराभव केला. सायनाने जर्मनीची फॅबियन देप्रेज हिच्यावर ३५ मिनिटांच्या खेळात २१-१८, २१-१० ने सरशी साधली.
पुरुष एकेरीच्या पहिल्या सामन्यात एका गेमने माघारल्यानंतरही मुसंडी मारून कियाओ बिन याला १७-२१, २२-२०, २१-१९ ने नमविणाऱ्या प्रणयला दुसऱ्या सामन्यात
मात्र चीनचा सातवा मानांकित
तियान होवेई याचा अडथळा पार करता आला नाही. प्रणयला ३३ मिनिटांत १३-२१, ५-२१ ने पराभवाचा धक्का बसला. भारताच्या के. श्रीकांतला मात्र चीनच्या झाओ जुनपेंगकडून १९-२१, २१-१९, १२-२१ गुणांनी पराभूत व्हावे लागले.
तत्पूर्वी, पहिल्या फेरीत आठवे मानांकन असलेल्या सायनाने ओकुहाराला २१-१५, २१-१४ गुणांनी नमविले. सायनाने जापानच्या या खेळाडूविरुद्ध आतापर्यंत ६ वेळा विजय नोंदविला असून, ती फक्त एकदा पराभूत (६-१) झाली आहे.
(वृत्तसंस्था)