आशियाई चषक बॅडमिंटन : सायना, श्रीकांत, सिंधू दुसऱ्या फेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:24 AM2018-04-26T00:24:40+5:302018-04-26T00:24:40+5:30
दुसरीकडे रियो आॅलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणाºया पी. व्हि. सिंधूने आपल्या नावाला साजेसा खेळ करीत चीनी तैपईच्या पाइ यू पोला २१-१४, २१-१९ गुणांनी नमवित दुसºया फेरीतील आपली जागा निश्चित केली.
वुहान : भारताच्या आघाडीचे बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, के. श्रीकांत आणि पी. व्ही. सिंधू यांनी आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत आपआपल्या प्रतिस्पर्धांचा पराभव करून दुसºया फेरीत प्रवेश केला.
राष्टÑकुल स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या सायना नेहवालने महिलांच्या एकेरीत सिंगापूरच्या यिओ जिया मिनचा सरळ दोन सेटमध्ये २१-१२, २१-९ गुणांनी पराभव करून दुसºया फेरीत प्रवेश केला. दुसरीकडे रियो आॅलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणाºया पी. व्हि. सिंधूने आपल्या नावाला साजेसा खेळ करीत चीनी तैपईच्या पाइ यू पोला २१-१४, २१-१९ गुणांनी नमवित दुसºया फेरीतील आपली जागा निश्चित केली. पुरूषांच्या एकेरीत अग्रमानांकित आणि राष्टÑकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाºया भारताच्या के. श्रीकांला जापानच्या केंता निशिमोतोविरूद्द खेळताना घाम गाळावा लागला. या दोघांची ळैत तीन गेममध्ये गेली.
श्रीकांतने निशिमोतोविरूध्द पहिली गेम १३-२१ गुणांनी गमाविली. नंतर श्रीकांतने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून निशिमोतोला कोणतीही संधी न देता दुसरी व तिसरी गेम अनुक्रमे २१-१६, २१-१६ गुणांनी जिंकून दुसºया फेरीत प्रवेश केला. भारताच्या समीर वर्माला मात्र पुरूष एकेरीत पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला. समीरला चीनी तैपईच्या चाउ टिएने २१-२३, १७-२१ गुणांनी नमविले. (वृत्तसंस्था)
अर्जुन, श्लोक दुहेरीच्या पुढच्या फेरीत
भारताचा अर्जुन एमआर आणि रामचंद्रन श्लोक यांनी पुरुष दुहेरीत तर मघना जक्कमपुदी आणि पूर्विशा एसराम यांनी महिला दुहेरीत आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून पुढच्या फेरीत प्रवेश केला. अर्जुन-श्लोक जोडीने कोरियाच्या चुंग सियोक व किम डुकयोंग जोडीला २५-२३, २३-२१ असे नमविले. दुसरीकडे मेघना आणि पूर्विशाने ओेंग रे नी व वोंग जिया यिग क्रिस्टल या सिंगापूरच्या जोडीला १४-२१, २२-१०, २१-१७ असे नमविले.