सायना, श्रीकांत यांना पराभवाचा धक्का

By admin | Published: December 10, 2015 12:59 AM2015-12-10T00:59:49+5:302015-12-10T00:59:49+5:30

भारताचे अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि के. श्रीकांत यांना वर्ल्ड सुपर सिरीज फायनल बॅडमिंटन स्पर्धेत पहिल्याच फेरीत अनुक्रमे नोजोमी ओकुहारा

Saina, Srikanth lose the toss | सायना, श्रीकांत यांना पराभवाचा धक्का

सायना, श्रीकांत यांना पराभवाचा धक्का

Next

दुबई : भारताचे अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि के. श्रीकांत यांना वर्ल्ड सुपर सिरीज फायनल बॅडमिंटन स्पर्धेत पहिल्याच फेरीत अनुक्रमे नोजोमी ओकुहारा व केंटो मोमोटाकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला.
महिलांच्या एकेरीत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या आणि
नुकत्याच दुखापतीतून सावरलेल्या सायनाला आपल्या नावाला साजेसाच खेळ करता आला नाही. पहिल्या गेममध्ये १०-१० पासून तर १४-१४ गुण होईपर्यंत सायनाने कडवी झुंज देण्याचा प्रयत्न केला. पण जागतिक क्रमवारीत १० क्रमांकावर असलेल्या २० वर्षीय नोजोमी ओकुहाराने पहिली गेम २१-१४ अशी जिंकली. दुसऱ्या गेममध्येसुद्धा सायनाला नोजोमीने कोणतीही संधी दिली नाही. तिने दुसरी गेम २१-६ अशी सहज जिंकत सामना ३५ मिनिटांत जिंकला. पुरुषांच्या एकेरीत भारताच्या के. श्रीकांतला जपानच्या
मोमोटा के. ने २१-१३, २१-१३
असे नमविले.(वृत्तसंस्था)

Web Title: Saina, Srikanth lose the toss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.