सायनाचे लक्ष विजेतेपदावर

By admin | Published: January 17, 2017 07:45 AM2017-01-17T07:45:15+5:302017-01-17T07:45:15+5:30

मंगळवारपासून प्रारंभ होणाऱ्या मोसमातील पहिल्या ग्रांप्री गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेद्वारे सायना नेहवाल आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे.

Saina's focus on winning | सायनाचे लक्ष विजेतेपदावर

सायनाचे लक्ष विजेतेपदावर

Next


सारावाक : आज, मंगळवारपासून प्रारंभ होणाऱ्या मोसमातील पहिल्या ग्रांप्री गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेद्वारे सायना नेहवाल आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. सायनाने मलेशिया मास्टर्स स्पर्धेत जेतेपद पटकाविण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
सायनाने अलीकडेच प्रीमिअर बॅडमिंटन लीगमध्ये तीन सामने जिंकले, तर तिला आॅलिम्पिक चॅम्पियन कॅरोलिना मारिन व रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू यांच्याविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. अव्वल मानांकित सायनाला या स्पर्धेच्या निमित्ताने लय गवसण्याची चांगली संधी मिळाली आहे. कारण या स्पर्धेत कुणी अव्वल खेळाडू सहभागी झालेले नाहीत.
गेल्या मोसमात सायना दुखापतीतून सावरल्यानंतर आॅस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत जेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरली होती; पण रिओ आॅलिम्पिक स्पर्धेदरम्यान तिच्या गुडघ्याला दुखापत झाली. त्यामुळे तिला दुसऱ्या फेरीत पराभव स्वीकारावा लागला. दुखापतीतून सावरल्यानंतर सायनाने मकाऊ ओपन व हाँगकाँग ओपनमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. प्रीमिअर बॅडमिंटन लीगमध्ये सायनाचा संघ अवध वॉरियर्सला उपांत्य फेरीपर्यंत मजल मारता आली.
पुरुष एकेरीमध्ये कश्यप पुनरागमन करण्याची शक्यता आहे. सहावे मानांकन प्राप्त अजय जयराम पहिल्या दिवशी पात्रता फेरीत खेळणार आहे. रिओ आॅलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व करणारा मनू अत्री व बी. सुमित रेड्डी दुहेरीमध्ये पात्रता फेरीत खेळणार आहेत. महिला विभागात अश्विनी पोणप्पा व एन. सिक्की रेड्डी या नव्या जोडीला मलेशियाच्या यी चिंग गो व के वेई वून या जोडीच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Saina's focus on winning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.