लिम्बाराम यांच्या उपचारासाठी क्रीडामंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 02:03 AM2020-04-26T02:03:02+5:302020-04-26T02:03:10+5:30

कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनमुळे त्यांच्या उपचारात अडथळे येत असल्याने लक्ष घालण्याची विनंती तिरंदाजी महासंघांने क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांचण्याकडे शनिवारी केली.

Sakade to Sports Minister for Limbaram's treatment | लिम्बाराम यांच्या उपचारासाठी क्रीडामंत्र्यांना साकडे

लिम्बाराम यांच्या उपचारासाठी क्रीडामंत्र्यांना साकडे

Next

कोलकाता : आॅलिम्पिकमध्ये तीनवेळा भारताचे प्रतिनिधित्व करणारे अनुभवी तिरंदाज आणि प्रशिक्षक लिम्बाराम यांच्यावर नवी दिल्लीत उपचार सुरू आहेत. कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनमुळे त्यांच्या उपचारात अडथळे येत असल्याने लक्ष घालण्याची विनंती तिरंदाजी महासंघांने क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांचण्याकडे शनिवारी केली.
भारतीय तिरंदाजी महासंघाचे महासचिव प्रमोद चांदूरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार अर्जुन आणि पद्मश्री पुरस्काराचे मानकरी ४७ वर्षांचे लिम्बाराम यांच्या पायावर सूज आली आहे. पत्नी मेरियन जेनीसोबत लिम्बाराम वर्षभरापासून जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये वास्तव्यास आहेत. त्यांना नियमित इनजेक्शन देणारा वैद्यकीय सहाय्यक लॉकडाऊनमुळे येत नसल्याने इंजेक्शन देण्यात अडचण येत आहे. शिवाय लिम्बाराम यांना एम्समध्ये तपासणीसाठी जाणे कठीण होऊन बसले आहे. चांदूरकर यांनी लिम्बाराम यांच्या प्रकृतीची माहिती महासंघाचे अध्यक्ष अर्जुन मुंडा यांना दिली. आमचे पदाधिकारी पतीपत्नीच्या संपर्कात असून योग्य व्यवस्था करण्यात येत आहे. शिवाय मुंडा यांनी क्रीडामंत्र्यांना विनंती केली. लवकरच त्यांच्यावर उपचार सुरू करण्याचे आश्वासनदेखील मिळाले असल्याची माहिती चांदूरकर यांनी दिली.
बार्सिलोना आॅलिम्पिक १९९२ मध्ये कांस्यपदक जिंकणारे लिम्बाराम यांना आर्थिक चणचणीमुळे एम्स आणि जीबी पंत इस्पितळात नियमित उपचार घेता येत नाही. मंत्रालयाने त्यांच्या उपचाराची पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. कोच या नात्याने लिम्बाराम यांनी २०१० च्या राष्टÑकुल स्पर्धेत तीन सुवर्ण, एक रौप्य आणि चार कांस्य पदके जिंकून दिली होती. त्यांच्या कार्यकाळात भारताचा रिकर्व्ह तिरंदाजी संघ नंबर वन बनला. लंडन आॅलिम्पिकमध्ये भारताच्या अपयशी कामगिरीमुळे लिम्बाराम यांच्या कराराचे नूतनीकरण करण्यात आले नव्हते. (वृत्तसंस्था)

Web Title: Sakade to Sports Minister for Limbaram's treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.