साक्षी व मीराबाई यांना पुरस्कार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 02:24 AM2020-08-22T02:24:31+5:302020-08-22T07:08:37+5:30
दरम्यान, क्रीडा मंत्रालयाने देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार खेलरत्नसाठी ज्या पाच खेळाडूंच्या नावाची शिफारस केली आहे, त्याचा स्वीकार केला आहे.
नवी दिल्ली : क्रीडा मंत्रालयाने यापूर्वी खेलरत्न पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या साक्षी मलिक व मीराबाई चानू यांना अर्जुन पुरस्कार न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा प्रतिष्ठेचा पुरस्कार पटकाविणाऱ्या खेळाडूंची संख्या आता २७ झाली आहे. दरम्यान, क्रीडा मंत्रालयाने देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार खेलरत्नसाठी ज्या पाच खेळाडूंच्या नावाची शिफारस केली आहे, त्याचा स्वीकार केला आहे.
>द्रोणाचार्य पुरस्कार (जीवनगौरव)
धर्मेंद्र तिवारी (तिरंदाजी), पुरुषोत्तम राय (अॅथलेटिक्स), शिवसिंग (बॉक्सिंग), रोमेश पठानिया (हॉकी), कृष्णकुमार हुड्डा (कबड्डी), विजय मुनिश्वर (पॅरा पॉवरलिफ्टिंग), नरेश कुमार (टेनिस), ओम प्रकाश दहिया (कुस्ती).