साक्षी, बजरंग यांच्यावर भारताची मदार, जागतिक कुस्ती : विनेश फोगाटकडूनही पदकाची आशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 01:33 AM2017-08-21T01:33:24+5:302017-08-21T01:34:33+5:30
सोमवारपासून सुरू होत असलेल्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत आॅलिम्पिक पदकविजेती साक्षी मलिक आणि आशियाईविजेता बजरंग पुनिया भारतीय संघाच्या मोहिमेचे नेतृत्व करतील. रिओ आॅलिम्पिकमध्ये ५८ किलो वजनी गटात कांस्य जिंकणाºया साक्षीवर भारताची प्रामुख्याने मदार असेल. दरम्यान, साक्षीने आपला वजनी गट वाढवला असून तिने आशियाई अजिंक्यपद स्पर्धेच्या ६० किलो वजनी गटात रौप्य जिंकले होते.
पॅरिस : सोमवारपासून सुरू होत असलेल्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत आॅलिम्पिक पदकविजेती साक्षी मलिक आणि आशियाईविजेता बजरंग पुनिया भारतीय संघाच्या मोहिमेचे नेतृत्व करतील. रिओ आॅलिम्पिकमध्ये ५८ किलो वजनी गटात कांस्य जिंकणाºया साक्षीवर भारताची प्रामुख्याने मदार असेल. दरम्यान, साक्षीने आपला वजनी गट वाढवला असून तिने आशियाई अजिंक्यपद स्पर्धेच्या ६० किलो वजनी गटात रौप्य जिंकले होते.
त्याचप्रमाणे, आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील अन्य रौप्यविजेती विनेश फोगाट ४८ किलो वजनी गटामध्ये आव्हान उभे करेल. रिओ आॅलिम्पिक स्पर्धेत झालेल्या दुखापतीनंतर विनेशने आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत ५५ किलो वजनी गटात खेळण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, जागतिक स्पर्धेत ती ४८ किलो वजनी गटातून खेळेल. त्याचवेळी गीता आणि बबिता यांनी निवड प्रक्रियेमध्ये सहभाग न घेतल्याने, तर रितू आणि संगीता पात्रता फेरीतच अपयशी ठरल्याने या स्पर्धेत खेळणार नाहीत.
पुरुषांमध्ये फ्रीस्टाइल गटात बजरंग भारताकडून सुवर्णपदकाचा दावेदार असेल. त्याने २०१३ बुडापेस्ट जागतिक स्पर्धेत कांस्य पटकावले होते. आशियाई स्पर्धेतही त्याने सुवर्णपदकावर कब्जा केला होता. या स्पर्धेत बजरंग ६५ किलो वजनी गटातून सहभागी होईल. बजरंगव्यतिरिक्त संदीप तोमरवर (५७ किलो) भारताची मदार असेल. तसेच अमित धनगड (७०), प्रवीण राणा (७४) आणि सत्यवान कादियान (९७) यांच्याकडूनही भारताला अपेक्षा आहेत. (वृत्तसंस्था)
भारतीय संघ
पुरुष फ्रीस्टाइल :
संदीप तोमर (५७ किग्रा), हरफूल (६१), बजरंग पुनिया (६५), अमित धनगड (७०), प्रवीण राणा (७४), दीपक (८६), सत्यव्रत कादियान (९७) आणि सुमित (१२५).
महिला कुस्ती :
विनेश फोगाट (४८), शीतल (५३), ललिता (५५), पूजा ढांडा (५८), साक्षी मलिक (६०), शिल्पी (६३), नवज्योत कौर (६९) आणि पूजा (७५).
ग्रीकोरोमन
ज्ञानेंदर (५९),
रविंदर (६६), योगेश (७१), गुरप्रीत सिंह (७५),
हरप्रीत सिंह (८०),
रविंदर खत्री (८५),
हरदीप (९८) आणि
नवीन (१३०).