साक्षी, नील यांना जेतेपदाचा मान

By admin | Published: June 19, 2016 04:23 AM2016-06-19T04:23:00+5:302016-06-19T04:23:00+5:30

शारदा जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत दहा वर्षांखालील मुलांच्या गटात नील मुळे व मुलींच्या गटात साक्षी पवार यांनी जेतेपद संपादन केले.

Sakshi, Neel is the honor of the title of the crown | साक्षी, नील यांना जेतेपदाचा मान

साक्षी, नील यांना जेतेपदाचा मान

Next

पुणे : शारदा जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत दहा वर्षांखालील मुलांच्या गटात नील मुळे व मुलींच्या गटात साक्षी पवार यांनी जेतेपद संपादन केले.
शारदा स्पोर्ट्स सेंटर येथे ही स्पर्धा झाली. अव्वल मानांकित नील मुळे याने सहाव्या मानांकित वेदांग जोशी याच्यावर ११-७, ११-५, ११-७, तर सहाव्या मानांकित साक्षी पवारने राधिका सकपाळ हिच्यावर ९-११, ११-९, ११-९, ११-९ अशी मात करून जेतेपद संपादन केले.
तत्पूर्वी झालेल्या उपांत्य सामन्यात नील मुळे याने चौथ्या मानांकित पार्थ चाफेकर याला ११-५, ८-११, ११-२, ११-९, तर वेदांग जोशीने दुसऱ्या मानांकित अद्वैत ढवळे याला १३-११, ११-७, ११-७ असा पराभवाचा धक्का देत अंतिम फेरी गाठली होती.
मुलींच्या गटात राधिका सकपाळने अव्वल मानांकित देवयानी कुलकर्णी हिला ८-११, ११-७, ३-११, ११-९, ११-८ असा पराभवाचा धक्का देत अंतिम फेरीत प्रवेश केला. साक्षी पवारने दुसऱ्या मानांकित जान्हवी फणसेला ८-११, ११-७, ११-६, ११-२ असे नमवून अंतिम फेरीत प्रवेश केला.

Web Title: Sakshi, Neel is the honor of the title of the crown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.