Mirabai Chanu: जिद्दीला सलाम! मनगटाला दुखापत तरीही मीराबाई चानूने भारतासाठी जिंकलं पदक!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 11:40 AM2022-12-07T11:40:39+5:302022-12-07T11:41:01+5:30
World Championship स्पर्धेत 'ऑलिम्पिक चॅम्पियन'ला टाकलं मागे
Mirabai Chanu wins silver, World Championship: ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेती मीराबाई चानूने मंगळवारी जागतिक स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. तिने एकूण २०० किलो वजन उचलले. मीराबाई काही काळापासून मनगटाच्या दुखापतीशी झुंजत होती, पण तरीही तिला पदक जिंकण्यात यश आले. तिने स्नॅचमध्ये ८७ किलो आणि 'क्लीन अँड जर्क'मध्ये ११३ किलो वजन उचलले. या पदकासह तिने पॅरिस ऑलिम्पिकसाठी आपला दावा अधिक प्रबळ केला आहे.
🥈 for Mirabai Chanu at the Weightlifting World Championships 😍@mirabai_chanu clinched 🥈 in Women's 49kg event with a total lift of 200kg (87kg snatch + 113kg clean & jerk), beating 🇨🇳Olympic champ Hou Zhihua (198kg) 🔥
— SAI Media (@Media_SAI) December 7, 2022
Congratulations on your feat, champion 🙌 pic.twitter.com/V85Z9rfbIJ
मीराबाई चानूने राष्ट्रकुल स्पर्धेत तिसरे पदक आणि दुसरे सुवर्णपदक जिंकल्यानंतर प्रथमच एखाद्या स्पर्धेत भाग घेतला होता. तिच्या मनगटाला दुखापत झाल्याने ती काही काळ खेळापासून दूर होती. मात्र, या स्पर्धेत तिने जोरदार पुनरागमन केले. मीराबाईच्या या वजनी गटात अनेक दिग्गज खेळाडू होते, पण तरीही तिला पदक जिंकण्यात यश आले. या स्पर्धेचे सुवर्णपदक चीनच्या जियांग हुइहुआला मिळाले. तिने एकूण २०६ किलो वजन उचलले. दुसरीकडे ऑलिम्पिक चॅम्पियन हु झिझुई केवळ १९८ किलो वजनासह कांस्यपदक जिंकू शकली. तिला मीराबाईला मागे टाकले.
Mirabai also won the 🥈 in clean and jerk 🔥 pic.twitter.com/S4xjT8JF50
— SAI Media (@Media_SAI) December 7, 2022
पॅरिस ऑलिम्पिकचा मार्ग झाला सोपा
मीराबाईच्या दुखापतीचा परिणाम तिच्या खेळावर कुठेतरी दिसत होता. या कारणास्तव, ती केवळ मुख्य स्पर्धांमध्ये भाग घेत होती. पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट मिळण्यासाठी ही जागतिक स्पर्धा खूप महत्त्वाची होती. मीराबाईला येथे मिळालेल्या रौप्यपदकामधून महत्त्वाचे गुण मिळाले. ते अंतिम पात्रता क्रमवारीत तिला उपयुक्त ठरतील. मीराबाईची नजर आता पुढील वर्षी होणाऱ्या २०२३ वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि २०२४ च्या वर्ल्ड कपवर असेल.
जेरेमी आणि संकेत दुखापतग्रस्त
२०२४ ऑलिम्पिक पात्रता नियमानुसार, वेटलिफ्टरला २०२३ वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि २०२४ वर्ल्ड कपमध्ये भाग घेणे आवश्यक आहेत. याशिवाय वेटलिफ्टरला इतर तीन स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा आहे. भारताचा पहिला युवा ऑलिम्पिक चॅम्पियन जेरेमी जुलैमध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याच्या मोहिमेदरम्यान जखमी झाला. त्यामुळे तो या स्पर्धेचा भाग नाही. राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदक विजेता संकेत सागरलाही कोपराला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यामुळे त्यालाही यात सहभागी होता येणार नाही.