समर्थची सलामी
By Admin | Published: October 31, 2014 12:46 AM2014-10-31T00:46:24+5:302014-10-31T00:46:24+5:30
विभागीय खो - खो स्पध्रेच्या पहिल्याच दिवशी पुरुषांच्या ‘क’ गटात o्री समर्थ व्यायाम मंदिरने विजयी सलामी दिली.
मुंबई : विभागीय खो - खो स्पध्रेच्या पहिल्याच दिवशी पुरुषांच्या ‘क’ गटात o्री समर्थ व्यायाम मंदिरने विजयी सलामी दिली. गुरुवारच्या लढतीत समर्थने 19-11 अशा फरकाने विजय क्लबचा पराभव केला.
अमर हिंद मंडळाने मुंबई खो खो संघटना व महाराष्ट्र संघटनेच्या मान्यतेने या स्पध्रेचे आयोजन केले. o्री समर्थच्या प्रणय मयेकर (2, 2:3क् मि. संरक्षण व 2 गडी), वरुण पाटील (2:4क् मि. संरक्षण व 2 गडी), तेजय शिरसकर (1:4क्, 1:5क् मि. संरक्षण व 2 गडी) यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले. विजयच्या आदेश पाडावे व पवन घाग यांनी कडवी झुंज दिली. ‘ड’ गटातील लढतीत o्री सह्याद्री संघाने यजमान अमरहिंदचा 17-16 असा आठ मिनिटे व एका गुणाने पराभव करून धक्कादायक निकाल नोंदविला. विजयी संघाकडून अक्षय भांगरेने (3, 1:1क् मि. संरक्षण व 2 गडी) व प्रणय राऊळ (1:2क्, 1 मि. संरक्षण व 2 गडी) यांनी चांगला खेळ केला. अमरहिंदतर्फे अभिषेक कागडा व अनिकेत आडारकर यांचे प्रय} अपयशी ठरले. ‘ब’ गटातील चुरशीच्या सामन्यात विद्यार्थी क्रीडा केंद्राने परांजपे स्पोर्ट्स क्लबचा 17-16 असा एका गुणाने पराभव केला. सामन्यात विद्यार्थी संघाच्या सागर मालक (1:2क्, 2:3क् मि. संरक्षण व 3 गडी), मयूर घोडगे (1:2क्, 1:1क् मि. संरक्षण व 4 गडी) व राहुल उईके (1:1क् मि. संरक्षण व 3 गडी) यांनी बहारदार खेळ केला. त्यांना परांजपेच्या प्रज्ञश पेंढारी (1:2क्, 1:4क् मि. संरक्षण ) व राहुल मेटकरी (4 गडी) यांच्याकडून कडवी टक्कर मिळाल्याने सामन्यात रंजकता आली. (क्रीडा प्रतिनिधी)